शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा तालुक्यातील १२ गावात आतापासूनच पाणीटंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:09 IST

नांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आ तापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने  सजग राहण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारीच्या अखेरीसच पाण्यासाठी भटकंती! 

संदीप गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आतापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने  सजग राहण्याची आवश्यकता आहे.नांदुरा तालुक्यातील बहुतांश गावामध्ये विहीर बोअरवेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. काही गावांना पूर्णामायचा आधार आहे. दरवर्षी  घटणार्‍या भूजल पातळीमुळे विहीर किंवा बोअरवेल बाराही महीने  पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात गावाशेजारील  एखाद्या पाणी उपलब्ध असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील विहीरी व  बोअरवेलचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु  यावर्षी भूजल पातळीत झालेल्या लक्षणीय घटीमुळे पाणी मिळणे कठीण  झाले आहे. मागील वर्षी तालुक्यातील २३ गावामध्ये २४ ठिकाणी  अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला होता; मात्र यावर्षी  जानेवारीतच १२ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत  असून, मार्चमध्ये अध्र्याधिक तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची  शक्यता आहे. पंचायत समितीमार्फत ८ गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव  तहसील कार्यालयाकडे तर ४ गावचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा  विभागाकडे परवानगीसाठी पाठविले असून, तहसील कार्यालयाने आता पर्यंत ५ गावांना अधिग्रहणासाठी परवानगी दिली आहे.

या गावात पाणीटंचाईची झळनांदुरा तालुक्यातील सिरसोडी, काटी, हिंगणे गव्हाड,. मामूलवाडी,  माळेगाव, पिंपळखुटा, विटाळी, शेलगाव, आंबोड.ा, चांदुर बिस्वा,  खेडा, मोमिनाबाद, नवे खेडगाव येथे भीषण पाणीटंचाईचा सामना  करावा लागणार असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीNanduraनांदूरा