शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निवारणासाठी चार गावांना टँकरने पाणीपुरठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:54 IST

बुलडाणा: मार्च महिन्याच्या तोंडावर जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत असून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागल आहे.

बुलडाणा: मार्च महिन्याच्या तोंडावर जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत असून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागल आहे. त्यानुषंगाने आता आणखी चार गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. सोबतच टंचाई काळात २६ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीलाही प्रशासनाने मान्यता दिली आहे.यात शेगांव तालुक्यातील गायगांव बुद्रूक, जलंब, सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा तसेच चिखली तालुक्यातील कोलारा येथे टंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलंब येथील दहा हजार लोकसंख्येकरीता दोन टँकर मंजूर करण्यात आले असून दररोज हे टँकर एक लाख ३६ हजार ६८० लिटरचा पाणीपुरवठा करणार आहे. गायगाव बु. येतील १४०० लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. कोलारा येथील चार हजार ६४० लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले. हे टँकर दररोज पावणे दोन लाख लिटर पाणीपुरवठा करणार आहे. किनगाव राजासाठीही दोन टँकर मंजूर करण्यात आले आहे.दरम्यान, २६ गावांसाठीच्या नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा, वाकद जहाँगीर, लोणार तालुक्यामधील सोमठाणा, टिटवी, पारडी, बोराखेडी, गुंधा, मातरखेड निजामपुर,  मेहकर तालुक्यातील  अंत्री देशमुख, सुकळी, बोरी, खामगांव तालुक्यातील जयपुर लांडे, कुंबेफळ, पोरज, हिंगणा कारेगाव, पळशी खु., पिंप्रि धनगर, नागापुर, रामनगर, माटरगाव गेरु, वझर, नांदुरा तालुक्यातील महाळूंगी, नायगाव, वळती बु.,चिखली तालुक्यातील  किन्होळा, भानखेड, किन्ही सवडद या गावांसाठी नळ योजना विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या  कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहेत. दरम्यान, चिखली तालुक्यातील सातगांव भुसारी, सिंदखेड राजा तालुक्यातील खैरव, गारखेड या गावांसाठी तात्पुरती पुरक नळ योजना मंजूर केली आहे.संबंधीत ग्रामपंचायतीने वीज देयक भरलेले नसल्याने नळ योजना बंद असले तर अशा ग्रामपंचायतीने प्रथम थकीत वीज देयकाची रक्कम भरून वीज पुरवठा सुरू करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी