शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जलआंदोलन ; पाण्यात राहल्याने युवकांना त्वचेचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 15:23 IST

मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी युवकांनी ३० मे रोजी कोराडी धरणामध्ये जल आंदोलन केले होते. या जलआंदोलनामुळे काही युवकांना रोगराई झाली  आहे.

ठळक मुद्दे नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, चुकीचा सर्वे करणाºया तलाठी व कृषी सहाय्यकावर कारवाई व्हावी, यासाठी कोराडी धरणात जल आंदोलन केले होते. तहसिलदार यांनी चौकशी करण्याच्या सूचना केल्यावरुन आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सतत दोन दिवस युवक कोराडी धरणाच्या पाण्यामध्येच होते. या पाण्यामुळे पवन गाभणे व विजय सुरूशे यांच्या शरिरावरचे कातडे जात आहेत. युवक सतत आजारी पडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी युवकांनी ३० मे रोजी कोराडी धरणामध्ये जल आंदोलन केले होते. या जलआंदोलनामुळे काही युवकांना रोगराई झाली  आहे. केलेल्या चौकशीवर १५ जुनपर्यंत कारवाई न झाल्यास २६ जूनपासून पुन्हा कोराडी धरणात जल आंदोलन करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे. देऊळगाव माळी येथे १३ फेबु्रवारी रोजी गारपीट झाली होती. त्यावेळी तलाठी व कृषी सहाय्यक यांनी नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे केला होता. परंतू नुकसानग्रस्तांच्या अनुदान यादीतून अनेक शेतकºयांना वगळण्यात आले होते. वगळलेल्या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, चुकीचा सर्वे करणाºया तलाठी व कृषी सहाय्यकावर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष पवन गाभणे, स्वप्निल गाभणे, विशाल मगर, मोहन मगर, विजय सुरूशे, ज्ञानेश्वर अंभोरे, संदिप गाभणे, गजानन गाभणे, वैभव मगर, दीपक मगर आदींनी कोराडी धरणात जल आंदोलन केले होते. जवळपास दोन दिवस सदर युवक पाण्यामध्येच होते. तहसिलदार यांनी चौकशी करण्याच्या सूचना केल्यावरुन आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सतत दोन दिवस युवक कोराडी धरणाच्या पाण्यामध्येच होते. या पाण्यामुळे पवन गाभणे व विजय सुरूशे यांच्या शरिरावरचे कातडे जात आहेत. युवक सतत आजारी पडत आहेत.  एवढे होऊनही चौकशी समितीने केलेल्या अहवालावर १५ जूनपर्यंत कारवाई न झाल्यास २६ जून पासून कोराडी धरणात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरagitationआंदोलन