शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उशाला, कोरड घशाला; वरवट बकाल तालुक्याची स्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:50 IST

वरवट बकाल : तालुक्यातील  वरवट बकाल ग्राम पंचायतच्या  दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही  वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत  आहे. 

ठळक मुद्देपाणी पुरवठा विस्कळीत

नारायण सावतकर। लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : तालुक्यातील  वरवट बकाल ग्राम पंचायतच्या  दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही  वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत  आहे. वरवट बकाल ग्राम पंचायत अंतर्गत एकूण सुमारे पाच ते साडे पाच  हजार लोकसंख्या असून, ग्रामपंचायतकडे एक विहीर व एक टूबेल  तसेच भाडे तत्त्वावर एक टूबेल आहे; मात्र गावात पाणी पुरवठा सुरळीत  होत नाही. या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस् थांमधून होत आहे.   ग्राम विकास अधिकारी हे पद गेल्या कित्येक  महिन्यांपासून प्रभारी असल्याने ते  सुद्धा मुख्यालयी राहत नाहीत; तसेच   ग्रामपंचायतला दिलेल्या दिवसालासुद्धा त्यांची गैरहजेरी राहते. त्यामुळे  गावातील विविध कामे खोळंबली आहेत.  ग्रामपंचायतकडे काकनवाडा शिवारात असलेल्या टूबेलवरून पाणी  पुरवठा येत असल्याने सदर पाइप लाइनमधून पाणी गळतीचे प्रमाण  जास्त आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय होताना  दिसून येतो. परिणामी गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. अनेक  वेळा  ग्रामपंचायतकडून पाइप लाइन दुरुस्ती करण्यात आली; मात्र ही  समस्या कायमच दिसून येत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असून,  पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे गावात पाणी समस्या  निर्माण झाली आहे. याकरिता पाइपलाइन गळती थांबून त्यावर नवीन  पाइपलाइन करावी व गाव योजनेचे पाणीपुरवठा लवकर सुरु करण्यात  यावा, अशी मागणी वरवट बकाल ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे. 

ग्रामविकास अधिकार्‍यांचे दुर्लक्षगावातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, याकडे ग्रामविकास  अधिकार्‍यांचे दुर्लक्ष दिसून येते. तसेच दिलेल्या दिवसाला ग्रामविकास  अधिकारी गावात हजर राहत नसल्याने नागरिकांचे अनेक कामे प्रलंबित  पडत आहेत. ग्राम विकास अधिकारी कोरे यांचा शनिवार हा दिवस  वरवट ग्रामपंचायत येथे असताना ते गैरहजर होते. दरम्यान, यासंदर्भात  कोरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

पाण्याचा अपव्ययवरवट बकाल गावाला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन वारंवार फुटत  आहे. पाइपलाइन लिकेज होण्याचा या प्रकारामुळे पाण्याचा अ पव्ययसुद्धा वाढला आहे. त्यामुळे वरवट बकाल ग्रामस्थांना कृत्रिम पाणी  टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन पाइपलाइन प क्की करण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी