शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:05 IST

बुलडाणा : शहरातून दैनंदिन संकलित केला जाणारा कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करून डपिंग ग्राऊंडमधील ८० टक्के जागा मोकळी केल्या जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातून दैनंदिन संकलित केला जाणारा कचरा हा हनवतखेड येथील डंपिंग ग्राऊंडवर न साठवता या कचºयावर तसेच साठलेल्या जुन्या कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करून डपिंग ग्राऊंडमधील ८० टक्के जागा मोकळी केल्या जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. डंपिंग ग्राऊंडमुळे हनवतखेड येथील नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका व बुलडाणा शहरातील घन कचरा व्यवस्थापन या अनुषंगाने आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.बुलडाणा शहरातून दररोज तब्बल १७ मेट्रीक टन कचरा संकलित केला जातो. शहरातून संकलित केलेला हा कचरा सद्यस्थितीत हनवतखेड नजीकच्या डंपिंग ग्राऊंडवर साठवला जातो. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून आजार फैलण्याची शक्यता लक्षात घेता हनवतखेड येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात तेथील नागरिकांनी हा कचरा डेपो हटविण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नातून २०१८ मध्ये बुलडाणा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी एक कोटी ३२ लक्ष रूपयांचा निधी सुध्दा नगर परिषदेस प्राप्त झालेला आहे. मात्र नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे २५ घंटागाड्यांच्या खरेदीव्यतिरिक्त घन कचरा व्यवस्थापनाच्या इतर अनुषंगिक कामांमध्ये नगर परिषद प्रशासनास सारस्य असल्याचे दिसून येत नाही. यापार्श्वभूमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुलडाणा शहराच्या व जनहिताच्या समस्यांबाबत निर्ढावलेल्या नगर परिषदेस चांगलेच धारेवर धरले आहे. त्याअनुषंगानेच मंगळवारी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा शहराचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व डंपिंग ग्राऊंडवरील शास्त्रीय प्रक्रीया याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा शहरातून दैनंदिन संकलित केल्या जाणाºया १७ मेट्रीक टन कचºयावर यापुढे शास्त्रीय पध्दतीने प्रक्रीया करून डंपिंग ग्राउंडमधील ८० टक्के जागा रिकामी करण्यात येईल असे सांगितले. त्यासाठी आवश्यक असलेली स्थापत्य विषयक कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही दिली आहे. या प्रश्नामुळे बुलडाणा शहरातील घनकचरा संकलन व शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीयेचा गंभीर प्रश्न मार्गी लागणार असून हनवतखेडवासियांना सुध्दा दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ