शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

मतदान हा लोकशाहीचा लोकोत्सव - रमेश थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:13 IST

रंगभूमी प्रयोग परिरिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रमेश थोरात यांच्याशी साधलेला संवाद... 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क  संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा समान हक्क दिला आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही भेद पाळल्या जात नाही. त्यादिवशी मतदार हा राजा असतो. ही भावना समाजमनात रूजविण्यासाठी कलेतून जनजागृतीचा आपला प्रयत्न असतो. रंगभूमी प्रयोग परिरिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रमेश थोरात यांच्याशी साधलेला संवाद... 

 कला आणि अभिनयाच्या क्षेत्राची सुरूवात कधी झाली? वयाच्या सातव्यावर्षी इयत्ता दुसरीत असताना एका नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका वठविण्याचा योग आला. तेथूनच पुढे आपल्या अभिनयाला सुरूवात झाली. मराठी आणि हिंदीतील १० सिनेमामध्ये विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय दूरचित्रवाणीवरील १७१ नाटके आणि एकांकिकामध्ये विविध भूमिका अदा केल्या आहेत. ‘सह्याद्री गलबलतो’ या महानाट्यात केलेली अफजलखानाची भूमिका प्रचंड गाजली होती.

मतदान जनजागृतीसाठी आतापर्यंत कोठे कोठे कलेचे सादरीकरण केले?   शासनाच्या विविध जनजागृती अभियानात विविध एकपात्री वेशभूषा सादर केल्या. आता विधानसभा निवडणुकीत विदुषकाच्या भूमिकेतून मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा आणि आता मुंबई येथे ‘मतदार राजा मतदान कर’ अशी साद अभियानातून घालत आहे. 

कचºया हिंदुस्थानी या एकपात्री प्रयोगाचं सादरीकरण कुठे झाले?माझ्याअंगी असलेल्या अभियनाला अजरामर ‘फॉरेन रिटर्न कचºया हिंदुस्थानी’ या एकपात्री प्रयोगानेच केले. या एकपात्री नाट्याचे महाराष्ट्रासह, दिल्ली, भोपाळ, हरियाणा आणि गुजरात राज्यात २०३७ प्रयोग सादर झाले आहेत. तर ‘कफन को जेब नही होती’ या नाट्याचेही ३२९ प्रयोग सादर करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले.

दुसºयाच्या चेहºयाच्या आनंद फुलविणे, ही भगवंताने प्रत्येक मनुष्याला दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. या कलेचा वापर करून मनुष्य जीवनसुखी करण्यासाठी प्रत्येकाने तत्पर असावे. दुसºयाला आनंद देतो, तेव्हाच कोणत्याही मनुष्याला खरा आनंद प्राप्त होतो. प्रेम आणि आनंद या दोनच गोष्टी मनुष्य जन्माचा अनमोल ठेवा आहेत.

कलेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीसाठी योगदान काय ?बाबा आमटे आणि नटसम्राट यांच्या प्रेरणेमुळे कलेच्या क्षेत्रात पर्दापण झाले.  कचºया हिंदूस्थानी, कफन को जेब नही होती, दंगल शांततेत पार पडली. गण्या गणपती गणपतराव, बकरी शेर खा-गई यासारख्या एकपात्री प्रयोगातून रसिकांचे प्रबोधन करण्याची संधी आपल्या प्राप्त झाली आहे. एकपात्री प्रयोगासोबतच होळी, रंगपंचमी, स्वच्छ भारत अभियान यासह शासनाच्या विविध अभियानात  एकपात्री प्रयोगातून कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी आपला पुढाकार असतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावinterviewमुलाखत