शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

आधार लिंकिंगकडे मतदारांची पाठ

By admin | Updated: May 15, 2015 01:10 IST

मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम; बुलडाणा जिल्ह्यात केवळ १४ हजार लिंकिंगचे काम.

बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंकिंग करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे; मात्र पुरेशा जनजागृतीअभावी हे काम थंड बस्त्यात असून, म तदारांनीच याकडे पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात मतदार ओळखपत्राशी आधार लिंकिंगचे काम केवळ १४ हजार ९१४ एवढेच झाले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंकिंग करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे; मात्र पुरेशा जनजागृतीअभावी मतदारांनी या मोहिमेला खो दिल्याचे दिसून येत आहे. मतदार याद्यातील घोळ, एकाच मतदाराचे दोन ते तीन ठिकाणी असलेले नाव, अशा विविध त्रुट्या दूर करून व एका मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रम आखला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम जिल्हाभर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर काही नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे; मात्र यात आधार कार्डशी लिंकिंग प्रक्रियेला विलंब होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात १८ लाख ७७ हजार ९३३ मतदार संख्या आहे; मात्र आतापर्यंत केवळ १४ हजार ९१४ एवढय़ाच मतदारांनी आधार कार्ड लिंकिंग केले आहे. यात मलकापूर मतदार संघात ८२६, बुलडाणा १७0८, चिखली १८0३, सिंदखेडराजा १९२३, मेहकर ३५७२, खामगाव ४२२४ तर जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात ८५९ मतदारांचा समावेश आहे. मतदारांचे छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व यूआयडीएआयची आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे असा मतदार याद्या शुद्धीकरणाचा उद्देश आहे. मतदार यादीतील दुबार नाव, मयत तसेच स्थलां तरित मतदारांची नावे वगळणे, छायाचित्रातील त्रुट्या दूर करून प्रमाणित मतदार यादी तयार करणे असाही या मोहिमेचा उद्देश आहे.