शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘विठ्ठला’ प्रमाणेच झाडांचीही भक्ती करा; वृक्षदिंडी काढून पटविले महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:05 IST

जागर मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने मलकापूर ते बुलढाणा वृक्ष दिंडी काढून वृक्ष लावण्याचे आवाहन करतानाच, प्रत्यक्ष वृक्षलागवडही करण्यात आली.

ठळक मुद्देवृक्ष लावा वृक्ष जगवा या बाबीवर भर देताना प्लास्टिकबंदी बाबतही ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. आय.एम.ए.चे शहरातील सर्व डॉक्टर या दिंडीत सहभागी झाले होते.या वृक्षदिंडीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. 

- मनोज पाटीलमलकापूर :     पंढरीच्या पांडुरंगाची सर्वच जण पुजा करतात. आषाढी एकादशीला तर भक्तांच्या उत्साहाला पारावार राहत नाही. हे करत असतानाच, ज्यांच्या भरवश्यावर पर्यावरणाचा समतोल अवलंबून आहे अशा झाडांचीही पुजा करा अर्थात झाडे लावा, असा संदेश विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूरात देण्यात आला. आषाढी एकादशीला समाजात जनजागृती करण्यासाठी  जागर मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने मलकापूर ते बुलढाणा वृक्ष दिंडी काढून वृक्ष लावण्याचे आवाहन करतानाच, प्रत्यक्ष वृक्षलागवडही करण्यात आली.वृक्ष लावा वृक्ष जगवा या बाबीवर भर देताना प्लास्टिकबंदी बाबतही ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. आषाढी एकादशीला वारकरी मोठ्या श्रद्धेने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता वारी करतात. या दिवसाचे औचित्य साधत  जागर मल्टिपर्पज फाउंडेशन च्या वतीने वृक्षाला दैवत मानून पूजन करीत वृक्ष दिंडीतून शेकडो वृक्षांचे व वृक्षबिजांचे रोपण करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीदरम्यान प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावावे व ते जगवावे असा आग्रह मलकापूर, दाताळा, शेलापूर, मोताळा,बुलढाणा या मार्गात नागरीकांकडे लावून धरण्यात आला.प्रत्येकाने देखभाली करीता किमान एक वृक्ष दत्तक घेतल्यास या भूमीवर पुन्हा नंदनवन फुलू शकते, या बाबीचे महत्व पटवून देण्यात आले. वृक्ष दिंडी द्वारे राजूर घाटात मोठ्या प्रमाणात बीजारोपण करण्यात आले. या वृक्षदिंडीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.  आय.एम.ए.चे शहरातील सर्व डॉक्टर या दिंडीत सहभागी झाले होते.वृक्षदिंडीतील या वारकºयांमध्ये डॉ.नितीन बºहाटे, डॉ.सोनाली बºहाटे, विजय बढे, विजय राणे, सौ.सीमा राणे, संदीप झोपे, विष्णू संभारे, मिलिंद भारंबे, गजेंद्र बावस्कर, मनीष नाफडे,गजेंद्र चव्हाण, सचिन खाचणे, प्रमोद कोलते, चंद्रकांत वर्मा यांच्यासह  जागर मल्टिपर्पज फाउंडेशनचे वारकरी, नागरीक या वृक्षदिंडीत सहभागी झाले.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूर