शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मेहकर शहरात श्रींच्या पालखीचे घेतले भाविकांनी दर्शन

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 01:33 IST

मेहकर : खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदंग तर मुखी श्रींच्या नावाचा जप करीत शेकडो वारकºयांसह संत श्री गजानन महाराजांच्या पालखीसह पायी दिंडीचे २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मेहकर शहरात आगमन झाले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीचे शारंगधर नगरीत जल्लोषात स्वागत केले.परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा सोमवारचा ...

ठळक मुद्देशारंगधर नगरीत जल्लोषात स्वागत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी

मेहकर : खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदंग तर मुखी श्रींच्या नावाचा जप करीत शेकडो वारकºयांसह संत श्री गजानन महाराजांच्या पालखीसह पायी दिंडीचे २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मेहकर शहरात आगमन झाले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीचे शारंगधर नगरीत जल्लोषात स्वागत केले.परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा सोमवारचा मुक्काम लोणार येथे होता. लोणार येथील मुक्कामानंतर सुलतानपूर मार्गे मंगळवारला पालखीचे सायंकाळी मेहकर येथे आगमन झाले. पालखी येणार म्हणून सकाळपासूनच पालखी मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी मंडप लावून व रांगोळी काढून जय्यत तयारी केली होती. शहरात पालखीचे आगमन होताच ढोल-ताशा व फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदंगाच्या तालावर वारकºयांनी ताल धरला. गावातून बालाजींच्या मंदिरात श्रींची पालखी मुक्कामासाठी थांबली असता हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दरम्यान, श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी मेहकर शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी दर्शनासाठी शहरात एकच गर्दी केली होती. पालखीच्या मुक्कामाची व्यवस्था येथील शारंधर बालाजी मंदिरात करण्यात आली होती, तर जेवणाची व्यवस्था रवि अग्रवाल यांच्यासह आदींनी केली होती.दरम्यान, सारंगपूर फाट्यावर श्रींच्या पालखीचे आगमन होताच दलितमित्र शिवाजीराव नवघरे, सुभाष निकस, नंदु बोरे यांनी पालखीचे दर्शन घेतले.तसेच मेहकर शहरात श्रींच्या पालखीचे आगमन होताच पैनगंगा नदीच्या तीरावर नगर परिषदेच्यावतीने नगराध्यक्ष कासम गवळी, उपाध्यक्ष जयचंद बाठीया, शिवसेना गटनेते संजय जाधव, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, पंकज हजारी, ललित इन्नाणी, राजेश अंभोरे, नीलेश मानवतकर, नीलेश सोमण, मुजीब खान, तौफी कुरेशी, मनोज जाधव, संतोष पवार, समाधान सास्ते यांनी पालखीचे स्वागत केले, तसेच कृउबासच्यावतीने सभापती माधवराव जाधव, बबनराव तुपे यांच्यासह डॉ.सुभाष लोहिया, डॉ.डी.एफ.माल. आशिष रहाटे, डॉ.विलास वºहाडे, गोपाल मोदाणी, सुरेश वाळूकर, भरत सारडा, अनिल शर्मा, विलास चनखोरे, अ‍ॅड.शैलेश देशमुख, गजेंद्र माने, जयदीप देशमुख, कलीम खान, भूषणभय्या देशमुख, सुदेश लोढे, सुरेश मुंदडा, बाळासाहेब सावजी, अ‍ॅड.अनंतराव वानखेडे, मधुकरराव गवई, कैलास सुखधाने, शैलेश बावस्कर, नावेदखान, शे.अजगर यांच्यासह शहरातील भाविकांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी शिवचंद्र मित्रमंडळ, राजमुद्रा संघटना, रामदास वेटाळ, जयमाता दी मित्रमंडळतर्फे स्वागत करण्यात आले, तसेच इमामवाडा चौकात मुस्लीम बांधवांनीही पालखीचे स्वागत केले.