शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यासाठी नंधाना येथील नागरिकांचे उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:16 IST

वाशिम : जिल्ह्यातील नंधाना (ता.रिसोड) येथे ग्रामपंचायत हद्दीतील पुतळा परिसरात काही लोकांनी केलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध पंच मंडळातील सचिव, सदस्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयानजिक १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील नंधाना (ता.रिसोड) येथे ग्रामपंचायत हद्दीतील पुतळा परिसरात काही लोकांनी केलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध पंच मंडळातील सचिव, सदस्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयानजिक १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात उपोषणकर्त्यांनी नमूद केले आहे, की गावातील मालमत्ता क्रमांक ४१९ वर ३० बाय ६० अशी १८०० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा पुतळा परिसराची आहे. गावातील बौद्धमंडळी त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, अन्नाभाऊ साठे व अन्य महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम घेतात. पुतळा परिसराची देखभाल ग्रामपंचायत व बौद्ध पंच मंडळ करित असते. असे असताना सदर जागेवर सतीश चतुर, संतोष चतुर, गणपत चतुर, ओंकार चतुर, दादाराव चतुर, बबन कांबळे आदिंनी विटा, सिमेंटचे पक्के अतिक्रमण केले आहे. मध्यंतरी गटविकास अधिकाºयांनी ग्रामपंचायतीला निर्देश देवून वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्तात सदर अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला. मात्र, सरपंचाने कुठलीच ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे अखेर बौद्ध पंच मंडळातील पदाधिकारी, सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोनठिकाणी व रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयासमोर १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन