ग्राम परिवर्तकांनी साधली ग्रामोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 03:57 PM2020-02-10T15:57:32+5:302020-02-10T15:57:48+5:30

बुलडाणा, अकोला जिल्हयातीलच नव्हेतर राज्यातील अनेक गावात महिला, नागरिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.

Village Changers Promote Village Promotion | ग्राम परिवर्तकांनी साधली ग्रामोन्नती

ग्राम परिवर्तकांनी साधली ग्रामोन्नती

googlenewsNext

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: विदर्भ, मराठवाड्यासह, कोकणातील आदीवासी व ग्रामिण भागात शासनाच्या कल्याणकारी योजना पोहचवून गुणवत्ताधारक परिवर्तकांनी ग्रामोन्नती साधल्याचे दिसून येते. त्याचेच फलीत म्हणून आज बुलडाणा, अकोला जिल्हयातीलच नव्हेतर राज्यातील अनेक गावात महिला, नागरिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असून ते आर्थीक सक्षम झाले आहेत.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान गेल्या तीन वर्षापासून राज्यातील १ हजार गावामध्ये राबवले जात आहे. याठिकाणी शासनाच्या विविध योजना व सामाजिक दायित्त्व कृती संगम घडवून आणण्याचा प्रयत्न उच्चशिक्षित ग्राम परिवर्तक सातत्याने प्रयत्न करीत आहे. अभियानात अतिमागास अशा आदिवासी व बिगर आदिवासी गावांचा समावेश असून, तालुका हा प्रमाण मानुन त्याप्रमाणे मानव विकास निदेर्शांकात सकारात्मक बदल घडवून आणतांना लोकांना मुलभुत सोई सुविधा जसे पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, रोजगार, कृषी क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन करण्यासोबत त्याचे नियमीत मुल्यांकन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शन व समन्वयातून गावात नाविण्यपूर्ण प्रयोग करून विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला सी.एस.आर. निधी उपलब्ध झाला आहे, त्यातून आरोग्य व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी करणे, कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र चालवणे कार्यान्वीत करण्यात आला.

बुलडाणा व अकोला जिल्हयात भरीव कामगिरी

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानअंतर्गत अकोला जिल्हयातील बार्शिटाकळी तालुक्यातील २२ गावात, अकोट तालुक्यातील ४ गावात याशिवाय बुलडाणा जिल्हयातील मोताळा (०१), शेगाव (१९) व चिखली (०२) अशा २३ गावात अनेक विकासात्मक कामे झाली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे कौतूक केले आहे. गोडंबी उद्योगाला चालना देणे, घरकूल निर्मीतीची कामे, शिलाई मशिन प्रशिक्षण व वाटप, डेअरी प्रोजेक्ट आदी उपक्रम राबविण्यात आले.

 

Web Title: Village Changers Promote Village Promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.