शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीबहाद्दरांवर राहणार ‘व्हिडिओ कॅमेर्‍याचा वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:09 IST

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान होणार्‍या गैरप्रकाराला आळा घालण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिकचे (बारावी)  इंग्रजी व गणित हे दोन विषय आणि माध्यमिकचे (दहावी) इंग्रजी, गणित-१, गणित-२ या तीन पेपरच्या कालावधीत कॉपी बहाद्दरांवर व्हिडिओ कॅमेर्‍यांचा वॉच ठेवण्यासाठी जिल्हानिहाय ...

ठळक मुद्देचित्रीकरणासाठी १२ हजार रुपये र्मयादा दहावीच्या तीन तर बारावीच्या दोन पेपरचा समावेश

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान होणार्‍या गैरप्रकाराला आळा घालण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिकचे (बारावी)  इंग्रजी व गणित हे दोन विषय आणि माध्यमिकचे (दहावी) इंग्रजी, गणित-१, गणित-२ या तीन पेपरच्या कालावधीत कॉपी बहाद्दरांवर व्हिडिओ कॅमेर्‍यांचा वॉच ठेवण्यासाठी जिल्हानिहाय खर्चाची र्मयादा १२ हजार रुपये देण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत होणारी इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळले जावे, यादृष्टीने भरारी पथकांच्या स्थापनेबरोबरच परीक्षा केंद्र परिसराचे चित्रीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्या अनुषंगाने परीक्षा काळातील चित्रीकरणासाठी जिल्हानिहाय १२ हजार रुपये खर्चाची र्मयादा ठेवण्यात आली आहे. इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर २१ फेब्रुवारीला व गणित ३ मार्च रोजी होत असून, या दोन्ही परीक्षेला व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर ८ मार्च, गणित-१ विषयाचा पेपर १0 मार्च आणि गणित-२ विषयाचा पेपर १२ मार्च रोजी होणार असून, या तीन पेपरला व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. परीक्षा केंद्र व केंद्राच्या बाहेरील परिसर, व्हरांडा, कंपाऊंडचे  चित्रीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यांच्या भरारी पथक प्रमुखांना माध्यमिक शिक्षणाधिकारी कॅमेरे पुरवणार आहेत.  व्हिडिओ चित्रीकरणाच्या या उपक्रमामुळे परीक्षा काळात होणार्‍या गैरप्रकाराला चाप बसणार आहे. 

अशी पाळावी लागणार दक्षता परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करताना ज्या केंद्राचे चित्रीकरण चालू असेल त्या केंद्राचे नाव, जिल्हा, कोणत्या स्थानावर कॅमेरा आहे, पेपरचा विषय यांचे थोडक्यात समालोचन भरारी पथक प्रमुखांना करावे लागणार आहे. चित्रीकरण पथकाने परीक्षा केंद्राच्या दालनामध्ये, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या दालनामध्ये चित्रीकरण करू नये, तसेच परीक्षार्थी, पालक, परीक्षा केंद्रावरील कर्मचारी यांच्या मुलाखती घेऊ नयेत व परीक्षार्थींना कुठलाही अडथळा होणार नाही, याची दक्षता बाळगण्याच्या सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.   

उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान व्हिडिओ चित्रकरण करण्यात येणार असून, चित्रीकरणामुळे परीक्षार्थ्यांना पेपर लिहिण्यास परीक्षा संचालनालयात अडथळा होणार नाही. परीक्षार्थींचे लक्ष विचलीत होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. - श्रीराम पानझाडे,माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षा