शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

विदर्भ पंढरीत भक्तांची मांदियाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:23 AM

शेगाव : विदर्भ पंढरी संतनगरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या मंदिरात कार्तिक एकादशी सोहळा ३१ ऑक्टोबरला श्रींच्या पालखी नगर परिक्रमेसह व कीर्तन प्रवचनद्वारे साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देकार्तिक एकादशीनिमित्त श्रींची नगर परिक्रमा

गजानन कलोरे। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : विदर्भ पंढरी संतनगरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या मंदिरात कार्तिक एकादशी सोहळा ३१ ऑक्टोबरला श्रींच्या पालखी नगर परिक्रमेसह व कीर्तन प्रवचनद्वारे साजरा करण्यात आला.श्रींच्या रजतमुखवट्यांचे पूजन विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील यांच्या हस्ते करुन श्रींची पालखी दु.२ वाजता नगरपरिक्रमेकरिता निघाली. याप्रसंगी विश्‍वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, पंकज शितुत, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक रामेश्‍वर काठोळे, राजेंद्र शेगोकार, शरद शिंदे उपस्थित होते. श्रींच्या पालखी समवेत गज, अश्‍व, टाळकरी, पताकाधारी वारकर्‍यांचा सहभाग होता. प्रगटस्थळी विश्‍वस्त गोविंदराव कलोरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सीतामाता मंदिर येथे विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शीतलनाथ महाराज संस्थानच्या समोरुन श्रींची पालखी गेली असता विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील यांनी शीतलनाथ महाराज पूजन नारळ, दुपट्टा आदीद्वारे पूजन केले. यावेळी शीतलनाथ महाराज संस्थानचे विश्‍वस्त तुळशीदास पिंपळे, पुष्पाकर काठोळे, मोहन हुसे, पर्‍हाडे यांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन केले. श्रींच्या पालखी मार्गावर  भाविकांनी रांगोळ्या काढून व पूजन करुन दर्शन शिस्तीत घेतले. श्रींचे भक्त श्रावण पांडे यांनी चहाचे तसेच विश्‍वस्त किशोर टाक यांनी पालखीत सहभागी वारकर्‍यांना चहाचे वितरण केले.श्रींच्या पालखीत गजलक्ष्मी ही भक्तांचे आकर्षण ठरली. शिस्तीत पांढर्‍या शुभ्र वेशातील टाळकरी व पदाधिकारी शिस्त मार्गस्त होत होते याच्या समवेत श्री गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, विश्‍वंभर त्रिकाळ, गोविंदराव कलोरे, पंकज शितूत, महाविद्यालयाचे शरद शिंदे, रामेश्‍वर काठोळे, आदी मान्यवर सहभागी झाले होते. श्रींची पालखी नगर परिक्रमा करत संध्याकाळी मंदिरात दाखल झाली. यावेळी श्रींच्या भक्तांना टाळकरी यांचा रिंगण सोहळा  झाला. यावेळी ‘विठ्ठल माझा माझा गजानन माझा माझा’ या अभंगाने मंदिर परिसर दुमदुमला होता. संध्याकाळी महाआरती झाली.

७५ हजार भाविकांना फराळाचे वाटप !श्रीं गजानन महाराज संस्थानच्यावतीने ७५ हजार भाविकांना उपवासाचे फराळांचे शिस्तीत वाटप करण्यात आले. यात ७५ क्विंटल साबुदाणा उसळ वाटप झाले. यात १५ क्विंटल शेंगदाणे, १0 क्विंटल पोहा चिवडा, खाद्यगोड तेल, ७५ हजार केळी, ७0 कन्टेनर आमटी, आदी साहित्य वाटप करण्यात आले.

एसटी महामंडळाकडून जादा बसेसशेगाव आगाराच्या ७0 हजाराच्या वर एकदिवस कार्तिक एकादशीनिमित्त शेगावात दाखल झालेल्या भक्तांकरवी अतिरिक्त उत्पन्न मिळाले. यात जळगाव ३ गाड्या, शेगाव अकोट २ गाड्या, शेगाव-खामगाव २ गाड्या, शेगावच्या कार्तिक एकादशीनिमित्त जादा सोडण्यात आल्या होत्या.