शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

तूर व हरभऱ्याचे पैसे न मिळाल्याने विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशन कार्यालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 9:05 PM

नाफेडला विकलेल्या तूर व हरभराचे पैसे आठ महिन्यांनंतरही न मिळाल्याने नांदुरा तालुक्यातील शेतक-यांचा राग अनावर झाला.

मलकापूर : नाफेडला विकलेल्या तूर व हरभराचे पैसे आठ महिन्यांनंतरही न मिळाल्याने नांदुरा तालुक्यातील शेतक-यांचा राग अनावर झाला. शेतक-यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मलकापूर येथील विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड करीत कुलूप ठोकल्याची घटना घडली. नांदुरा तालुक्यातील ४८२ शेतक-यांनी त्यांचा ६८२४ क्विंटल हरभरा तीन कोटी रुपयांचा व ३५ शेतक-यांनी त्यांची २५ लाख रुपयांची तूर मार्च २०१८ मध्ये नाफेडला विकली आहे.सदरहू पैसे पेरणीचे आधी मिळावे म्हणून असंख्य निवेदने, विनंती अर्ज फाटे केले. परंतु राज्य शासनाने पैसे दिले नाही. शेवटी कर्ज काढून शेतक-यांनी पेरणी केली. तीन तीन वेळा पेरणी करूनही दुष्काळामुळे पीक आले नाही. दिवाळीत तरी राहिलेले पैसे मिळतील म्हणून या शेतक-यांनी मलकापूर येथील दि विदर्भ को-आॅप. मार्केटिंग फेडरेशन लि. मध्ये असंख्य चकरा मारल्या. दिवाळीसुद्धा कोरडी जाईल म्हणून हे शेतकरी आज अ‍ॅड. हरीश रावळ नगराध्यक्ष, बंटी पाटील, पुरुषोत्तम झालटे, शुभम ढवळे, अनिल गांधी यांचेसह कार्यालयात पोहचले असता, आजही पैसे मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आता दिवाळी काळी जाईल म्हणून सर्व शेतकरी संतप्त झाले व त्यांनी या कार्यालयाची प्रचंड तोडफोड करीत कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी भाजप सरकार हाय हाय, शेतक-यांना उपाशी मारणा-या सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी केली. अचानक तोडफोड व घोषणाबाजीमुळे या भागात असंख्य नागरिक जमा झाले होते. या आंदोलनात मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, पुरुषोत्तम झाल्टे (सरपंच पातोंडा), विधानसभा युवक अध्यक्ष बंटी पाटील, जिल्हा एनएसयूआय सरचिटणीस शुभम ढवळे, नगरसेवक अनिल गांधी, सुनील बगाडे तसेच विश्वजित पाटील, अविनाश वेरूळकर यांचेसह असंख्य शेतक-यांनी सहभाग घेतला.जर दोन दिवसांत शेतक-यांचे हक्काचे कष्टाने पिकवलेल्या धान्याचे पैसे शासनाने दिले नाही तर यानंतर आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. याची राज्य सरकार व केंद्र सरकारने नोंद घ्यावी. शेतक-यांचा अंत पाहू नये.- अ‍ॅड. हरीश रावळ, नगराध्यक्ष मलकापूर