बुलडाणा : विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर शस्त्र परवानाधारकांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांची स्क्रिनिंग कमिटी तयार करण्यात आली आहे. कोणत्या शस्त्र परवान्याची प्रत निवडणुकीच्या कालावधीत पोलिसांकडे जमा करावी, त्याबाबत ही समिती निर्णय घेणार आहे. जामिनावर मुक्त झालेल्या व्यक्ती, गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेल्या व्यक्ती, निवडणूक कालावधीत दंगलीत समावेश असलेल्या व्यक्ती तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पोलिसांना आवश्यक वाटलेल्या कोणत्याही शस्त्रधारकाच्या परवान्याबाबतचा निर्णय ही कमिटी घेणार आहे.
शस्त्रपरवानाधारकांची पडताळणी
By admin | Updated: September 18, 2014 00:37 IST