शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरात गर्दीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:14 IST

‘कोरोना’ ला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढल्याने प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. यासाठी शहरातील गर्दी होणाऱ्या ठिकाणची भाजीपाला विक्री बंद करण्यात आली आहे. मर्यादीत ठिकाणीच भाजीपाला विक्री सुरू ठेवण्यात आली असून या ठिकाणी देखील गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांची करडी नजर असल्याचे दिसून येत आहे. ‘कोरोना’ ला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.बुलडाण्यात पहिला ‘कोरोना’ पॉझीटीव्ह रुग्ण इकबाल चौक परिसरात आढळून आला. यामुळे हा संपूर्ण परिसर तेव्हापासून सील करण्यात आला आहे. याच परिसरात भाजीपाल्याचा बाजार असल्याने बाजार देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर भाजीपाला विक्रीसाठी शहरातील चार ठिकाणे निश्चित करण्यात आली. यामध्ये शासकीय अध्यापक विद्यालयाचे मैदान, लहाने लेऊटमधील मैदान, बाजार समिती परिसर व डॉ. लद्धड हॉस्पीटलच्या मागील मैदानाचा समावेश होता. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १५ वर पोहचल्याने विशेष खबरदारी म्हणून या सर्व ठिकाणची भाजीपाला विक्री बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येथे गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. आता मर्यादीत ठिकाणीच भाजीपाला विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. या दुकानांवरदेखील पोलिस प्रशासनाची करडी नजर आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित दुकान बंद करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.सलून, पानटपऱ्यांसमोर भाजीपाल्याची दुकानेसध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ लागू आहे. यामुळे सलून व पानटपºया धारकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. रोजगाराचे पर्यायी साधन म्हणून अनेकांनी चक्क सलून तथा पानटपरीसमोरच भाजीपाल्याचे दुकान थाटल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस