शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर नगराध्यक्षांच्या पत्नीचा आगळा वेगळा उपक्रम;  वटपुजेऐवजी केली वडाची लागवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:15 IST

मलकापुरात मात्र वटपुजेऐवजी साक्षात वडाची लागवड करून नगराध्यक्षांच्या सौ.वंदना रावळ यांनी, पर्यावरण संतुलनासाठीचा आगळा वेगळा संदेश वडरोपणाच्या माध्यमातून आज बुधवारी दिला.

ठळक मुद्देनगराध्यक्षांच्या पत्नी सौ.वंदना रावळ यांनी आगळा वेगळा उपक्रम राबविला. बुधवारी दुपारी त्यांनी शास्त्रीनगर परिसरात वटवृक्षाची लागवड केली नुसती लागवड करून न थांबता त्यांच्या वाढीची व संगोपनाचीही जबाबदारी त्यांनी घेतली आहे.वंदना रावळ यांनी राबविलेला उपक्रम महिलांसाठीच नव्हे तर समाजासाठी आदर्श ठरावा असाच आहे.

- हनुमान जगताप 

मलकापूर :  हिंदु धर्मातील सौभाग्यवतीसाठी अतिशय भाग्याची अशी वटसावित्री पौर्णिमा मानली जाते. यादिवशी सर्वत्र सुहासीनी सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाची पुजा करतात. मलकापुरात मात्र वटपुजेऐवजी साक्षात वडाची लागवड करून नगराध्यक्षांच्या सौ.वंदना रावळ यांनी, पर्यावरण संतुलनासाठीचा आगळा वेगळा संदेश वडरोपणाच्या माध्यमातून आज बुधवारी दिला.मराठी भाषिकात वटपौर्णिमेचा दिवस सौभाग्यवतींसाठी काही औरच असतो. यादिवशी सुवासिनी वडाच्या झाडाला वेगळ्या वेगळ्या मागण्यांची साद घालीत त्यांच्या कुंकवाच्या दिर्घायुष्यासाठी साकडे घालीत असतात. त्याचबरोबर सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी वटपुजन करी असतात असे सांगितल्या जाते. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात वाटचाल करीत असताना पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचा संदेश अधोरेखीत करीत असताना नगराध्यक्षांच्या पत्नी सौ.वंदना रावळ यांनी आगळा वेगळा उपक्रम राबविला. आज बुधवारी दुपारी त्यांनी शास्त्रीनगर परिसरात वटवृक्षाची लागवड केली नुसती लागवड करून न थांबता त्यांच्या वाढीची व संगोपनाचीही जबाबदारी त्यांनी घेतली आहे.दरम्यान या उपक्रमाविषयी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना वंदना रावळ यांनी सांगितले की, वृक्षकटाईमुळे पर्यावरण संतुलन बिघडले आहे. त्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. मात्र देशाचे नागरीक म्हणून प्रत्येकाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे म्हणूनच आज वटपौर्णिमेदिनी वटपुजेऐवजी वडाच्या झाडाचे रोपण आम्ही केले. वंदना रावळ यांनी राबविलेला उपक्रम महिलांसाठीच नव्हे तर समाजासाठी आदर्श ठरावा असाच आहे.

टॅग्स :Malkapurमलकापूरbuldhanaबुलडाणा