शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:50 IST

खामगाव: तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

- देवेंद्र ठाकरेखामगाव: तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.खामगाव तालुक्यात उर्दु माध्यमाच्या १८ शाळांसह जिल्हा परिषदेच्या एकूण १४४ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षक, सहाय्यक शिक्षक तसेच मुख्याध्यापक अशी ८४८ पदे मंजुर आहेत. यातील ७६६ पदे भरण्यात आली असून ८२ पदे अद्याप रिक्त आहेत. याचा परिणाम मुलाच्या भवितव्यावर होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळण्यात यामुळे व्यत्यय येत आहे. शिक्षकांची कारकुनी कामे वाढली आहेत. शासनाच्या विविध योजना, अभियानाचा ताणही शिक्षकांवर राहतोच. यामुळे तसेही विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा इतर कामांमध्येच शिक्षकांचा जास्त वेळ जातो. अनेक शाळांवरील मुख्याध्यापक पद रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. तसेच मुख्याध्यापक पदाचे कामकाज शिक्षकांना करावे लागत असल्याने अशी कामे करणाऱ्या शिक्षकांना अध्यापन करण्यास वेळ मिळत नाही. खामगाव तालुक्यात डोंगराळ भागात राहणाºया वाड्या-वस्त्यांमधिल गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळताना दिसत नाही. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठांनी लक्ष देऊन रिक्त पदे भरण्याची गरज आहे.अधिकारी कर्मचाऱ्यांची पदेही रिक्तखामगाव पंचायत समिती शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे. विस्तार अधिकारी ही चारही पदे रिक्त आहेत. खामगाव येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार असलेलया जी.डी. गायकवाड यांच्याकडे शेगाव येथील विस्तार अधिकारी पदाचाही प्रभार आहे. यामुळे तालुक्यात शिक्षण विभागाचे कामकाज प्रभावित होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावTeacherशिक्षक