शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात बनणार शहरी बेघर निवारा; सर्व्हेक्षणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 15:34 IST

बुलडाणा शहरात शहरी बेघरांसाठी कायमस्वरुपी निवारा उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील बेघर लोकसख्येच्या सर्व्हेक्षणास बुलडाणा शहरात प्रारंभ करण्यात आला असून २० जून २०१९ पर्यंत हे सर्व्हेक्षण सुरू राहणार आहे. दरम्यान, सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहरात शहरी बेघरांसाठी कायमस्वरुपी निवारा उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासंदर्भाने बुलडाणा पालिकेने हे पाऊल टाकले आहे.जानेवारी २०१९ पासून बुलडाणा शहरातील गुप्ता शाळेमध्ये तुर्तास तात्पुरत्या स्वरुपात शहरी बेघर निवारा उभारण्यात आला असून सध्य स्थितीत येथे तीन व्यक्ती आश्रयास आहे. पूर्वी येथे नऊ निराधार व्यक्ती आश्रयास होते. त्यापैकी सहा जणांचे रिहॅबिलिटेशन करण्यात आल्याने तुर्तास येथे तीन व्यक्ती आहेत. केंद्र सरकारच्या दिनदयाळ अंत्योदय योजना तथा राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत अनुषंगीक विषयान्वये शहरात १४ जून २०१९ पासून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने त्रयस्थ संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत असून फुटपाथवर, चौकात, उड्डाणपुलाखाली, बसस्थानक परिसरात राहणाऱ्यांचे यात सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. जे लोक रस्त्यावर किंवा अयोग्य अशा ठिकाणी विपरीत स्थितीत राहतात त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. या ठिकाणी संबंधितांना सर्व आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात. सोबतच बेघर निवारा कक्षाकडून त्यांना एक ओळखपत्र देण्यासोबतच सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीकोणातून त्यांना सुविधाही पुरविण्यात येतात. सध्या करण्यात येणारे हे सर्व्हेक्षण दिवस-रात्र स्वरुपात करण्यात येतेय. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात ५३ शहरात सध्या शहरी बेघर निवारा राज्यात ५३ शहरात सध्या शहरी बेघर निवारा सुरू झाला आहे. प्रामुख्याने जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असा निवारा असणे अनिवार्य करण्यात आले आहे. येथे बेघर, भिकारी व तत्सम व्यक्तींना विनामुल्य नागरी सुविधा पुरविण्यात येतात. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीकोणातूनही येथे सुविधा दिल्या जात असल्याचे पालिकेतील सुत्रांनी स्पष्ट केले.प्रामुख्याने ज्या शहरांची संख्या एक लाखांची आहे अशा शहरात हा निवारा उभारण्यात येतो. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तो उभारण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना