मोताळा तालुक्यात शून्य पॉझिटिव्ह
मोताळा : तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता घटली आहे. गेल्या आठवड्यापासून रोज तालुक्यातील कोरोना अहवालामध्ये पॉझिटिव्ह रुग्णसंख्या शून्य दर्शविण्यात येत आहे. कोरोना रुग्ण सापडत नसल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे.
इकोफ्रेंडली बाप्पा; कार्यशाळेवर भर
बुलडाणा: इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेवर सध्या भर दिला जात आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेश किंवा दुर्गामूर्ती बनविण्याची पद्धत पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ठरत आहे. पॅरिसची ही माती पाण्यात लवकर विरघळत नाही किंवा लवकर नष्ट होत नाही. त्यामुळे पर्यावरणाला याचा मोठा फटका बसत आहे. या पुढील काळात आपले पर्यावरण सांभाळायचे असेल तर शेतातील काळी माती किंवा शाडू मातीपासून मूर्ती तयार व्हाव्यात हा उद्देश समोर ठेवून कार्यशाळा आयोजित केली जात आहे.