शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची वाहतूक करणा-या युवकांवर बेरोजगारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:15 IST

मलकापूर( बुलडाणा) : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे रेती वाहतूक करणा-या बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी आली असून, यासह तालुक्यातील विविध विकास कामांना व खासगी बांधकामांना खीळ बसल्याने अनेकांचा रोजगारही डुबत आहे.

ठळक मुद्दे मलकापूर : बेरोजगारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर( बुलडाणा) : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे रेती वाहतूक करणा-या बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी आली असून, यासह तालुक्यातील विविध विकास कामांना व खासगी बांधकामांना खीळ बसल्याने अनेकांचा रोजगारही डुबत आहे. या सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करत शासनाने तत्काळ मलकापूर तालुका व परिसरातील   रेती घाटांची हर्रासी करावी,    रॉयल्टीचे दर कमी करण्यात यावे, अन्यथा त्या बेरोजगार युवकांना शासनाने पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा आग्रही मागणीसाठी शहर शिवसेना व रेती वाहतूकदार संघटनेच्यावतीने  शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले, माजी तालुका प्रमुख अरूण अग्रवाल यांच्या नेतृत्वात आज ५ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. अनेक तरूणांच्या वाहनांवर कर्जे असल्याने ते दुहेरी संकटात सापडले आहेत.     यामुळे शासनाने या सर्व बाबींचा तत्काळ गांभिर्याने विचार करावा व  रेती घाटांची हर्राशी करून रॉयल्टीचे दर कमी करावे, अशी मागणी  निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख किशोर            नवले, माजी तालुका प्रमुख अरूण अग्रवाल, मलकापूर ग्रामीणचे     सरपंच उमेश राऊत, राजू फुलोरकर, मुकेश लालवाणी, एकनाथ डवले, उमेश हिरूळकर, युवा सेना          जिल्हा उपप्रमुख अमोल टप, शहर प्रमुख योगेश ढगे, गौरव वानखेडे, वेदांत ढकळे, संतोष कोल्हे, रेती वाहतूकदार संघटनेचे श्रीकृष्ण      भगत, अरूण किनगे, प्रशांत अढाव, दिलीप देशमुख, आलीक   जवारीवाले, सौरभ पाटील, मंगेश पाटील, राजू सावरकर, विजय     गावंडे, सागर बेलोकार, संजय बावस्कार आदी उपस्थित होते. 

हप्ते भरण्याचीही सोय नाही स्वयंरोजगारासाठी कष्टकरू तरूणांनी रेती वाहतुकीची वाहने घेऊन आपला रोजगार सुरू केला होता; मात्र शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे त्या तरूणांवर आता उपासमारीची पाळी आली आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा