शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
3
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
4
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
5
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
6
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
8
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
9
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
10
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
11
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
12
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
13
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
14
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
15
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
16
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
18
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
19
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
20
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?

पळशी झाशीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 16:29 IST

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील २४ वर्षीय युवकाने शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

संग्रामपूर :  संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील २४ वर्षीय युवकाने शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. आत्महत्येपुर्वी युवकाने चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली. शासकीय व्यवस्थेचा आपण बळी ठरत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.पळशी शिवारातील एका  शेताच्या धु-यावरील निंबाच्या झाडाला सागर दिनकर वाघ (वय २४) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष केशव घाटे यांनी तामगाव पोलीस स्टेशनला दिली असता ठाणेदार डी.बी. इंगळे, तहसिलदार भूषण अहिरे यांच्यासह तलाठी कोतवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मृतकाच्या खिशात चारपानी चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये सागरने शासन कुचकामी ठरले असल्याचा उल्लेख करीत ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या असल्याचे नमूद केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व निकष पुर्ण करून सुध्दा घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. एकीकडे शासनाकडून मुद्रा लोनवर बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाल्याची आकडेवारी देवून शासन स्वत: पाठ स्वत:ची थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे मुद्रा लोनसाठी बँक प्रशासन बेरोजगारांची अडवणूक करीत आहे, सागर सोबतही असेच घडले.

संग्रामपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्र मधील बँक व्यवस्थापनाने सतत दोन वर्षे मुद्रा लोनसाठी सागरला बँकेचे उंबरठे झिजवायला लावले. परंतु लोन काही मिळाले नाही. या सर्व बाबींचा उल्लेख सागरने चिठठीत केला आहे. माझ्या मृत्यूनंत कुटूंबाला ५ लाख रूपयाची मदत द्यावी, तो पर्यंत माझे शव ताब्यात घेऊ नये, असेही चिठठीत नमुद असल्याने गावक-यांनी सागरचे शव ताब्यात घेण्यास नकार दिला. दुपारपर्यंत शव तहसील कार्याल्यातच होते. सागर हा उच्चशिक्षित होता त्याने एम.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. मात्र बेरोजगारी पुढे हतबल झाला. सागरच्या पश्चात आई-वडील दोन लहान भाऊ आहेत. सागरने चिठ्ठीत आई-वडील व भावांना धीर देत शेजारी व नातेवाईकांना त्यांच्याकडे लक्ष देण्याचे नमूद केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा