शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेच सावट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 11:36 IST

market committee elections in Buldana district कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट आहे.  

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपली असून, कोरोनामुळे निवडणुका न होता प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आणखी कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट आहे.  जिल्ह्यात शेगाव वगळता बारा कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांची मुदत संपली आहे. कोरोनामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुुकांना स्थगिती दिली आहे. कोरोनाचे रूग्ण कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथील करण्यात आला होता. अनेक व्यवसाय सुरू झाले होते. ग्रामपंचायतीच्याही निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणानने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मार्चनंतर घेण्याचे आदेश दिले होते. मात्र,  कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने  याबाबत पुन्हा अनिश्चितत निर्माण झाली आहे.  त्यामुळे ३१  मार्चनंतर बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होतील की आणखी पुढे ढकलाव्या लागतील, याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही.

प्रशासकांची मुदत वाढविणार

 जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असतो.  मात्र काही बाजार समित्यांमध्ये प्रशासकांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येणार आहे.

शेगाव वगळता जिल्ह्यातील २१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आगामी काळात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली तर पुढील आदेशानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.   - महेंद्र चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा  

टॅग्स :buldhanaबुलडाणाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक