शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अनधिकृत बांधकामे येणार उजेडात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 14:58 IST

राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना ही माहिती सादर करावी लागणार असल्याने सर्व अनधिकृत बांधकामे उजेडात येणार आहे.

-  ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: शहर हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते; मात्र यासाठी लागणाºया विकास शुल्कापोटी बांधकाम नियमित करण्याच्या प्रस्तावाकडे अनेकांनी कानाडोळा केला. परंतू आता अनधिकृत बांधकामासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती विधानसभा आश्वासन समितीकडून मागविण्यात आली आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना ही माहिती सादर करावी लागणार असल्याने सर्व अनधिकृत बांधकामे उजेडात येणार आहे.शहराच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृत इमारतींमध्ये कुटुंब वास्तव्य करत असल्याने त्या इमारती खाली करणे प्रशासनास अडचणी जातात. अशा अनधिकृत बांधकामामुळे होणारी हाणी लक्षात घेऊन ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय शासनाने ७ आॅक्टोबर २०१७ रोजी घेतला होता. तेंव्हापासून शहर हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार आणि दंड आकारून अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येत आहेत. त्यासाठी वास्तुविशारदामार्फत (आर्किटेक्ट) राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० जुलैची मुदत देण्यात आली होती. परंतू या प्रस्तावाबरोबर भरावा लगणारे विकास शुल्क वाचविण्यापोटी अनधिकृत बांधकाम केलेल्यांनी प्रस्तावच सादर केले नसल्याचे वास्तव आहे. राज्यातील काही महानगरपालिका व नगर पालिकेमध्ये तर अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा एकही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात विधानसभा आश्वासन समितीने ८ आॅगस्ट रोजी बैठक घेऊन राज्यातील अनधिकृत बांधकामाचा आढावा घेत बांधकाम नियमित करण्याच्या अंमलबाजावणीच्या सूचना दिल्या होत्या. त्या सुचनेच्या अनुषंगाने आश्वासन समितीने राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्याकडून अनधिकृत बांधकामे नियमित  करण्याच्या कार्यवाहीची माहिती मागविली आहे. यासंदर्भात १८ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपरिषदा व नगरपंचायतींचे सर्व मुख्याधिकाºयांना पत्र पाठविण्यात आले आहे. 

विकास शुल्क तिप्पटअनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रशासनाकडे कराव्या लागणाºया प्रस्तावावर विकास शुल्कही भरावे लागते. मात्र हे विकास शुल्क इतर विकास शुल्कांपेक्षा तिप्पट आहे. त्यामुळे विकास शुल्क जास्त असल्याकारणाने अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासंदर्भातील प्रस्ताव देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा