शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमरा येथील पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे केले बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:18 IST

पळशी बु.: जवळच असलेल्या उमरा (लासुरा) येथील पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकांची मागणी केली; मात्र यंदाचे सत्र संपत असले, तरी या शाळेला शिक्षक न दिल्याने गावातील सर्व पालकांनी ३१ जानेवारीपासून आपल्या मुलांना शाळेत पाठविणे बंद केले.

ठळक मुद्देशिक्षक देण्याची मागणी: पालकांकडून प्रशासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु.: जवळच असलेल्या उमरा (लासुरा) येथील पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकांची मागणी केली; मात्र यंदाचे सत्र संपत असले, तरी या शाळेला शिक्षक न दिल्याने गावातील सर्व पालकांनी ३१ जानेवारीपासून आपल्या मुलांना शाळेत पाठविणे बंद केले.बुलडाणा व अकोला या जिल्ह्याच्या सीमेवर मस नदीच्या काठावर येत असलेल्या उमरा (लासुरा) ता. खामगाव या गावाची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे.  येथे  जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा असून, या शाळेचे १ ते ४ असे वर्ग आहेत. वर्ग पहिलीमध्ये चार मुली, चार मुले, वर्ग दुसरीमध्ये तीन मुली, चार मुले, वर्ग तिसरीमध्ये सात मुली, तर वर्ग चौथीमध्ये तीन मुली, सहा मुले असे एकूण १७ मुली व १४ मुले असे एकूण ३१ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.  गेल्या २0१६-१७ या सत्रात या शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक धीरज  ठाकरे व शिक्षक एस.जी. पांढरे असे दोन शिक्षक होते; मात्र १0 जानेवारी २0१७ रोजी एस.जी. पांढरे या शिक्षकांची उमरा (लासुरा) या शाळेवरून कवळगाव येथील शाळेवर बदली झाली. तेव्हापासून उमरा येथील शाळेवर शिक्षक नाही.  त्यामुळे   विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे गावातील पालक व शाळा व्यवस्थापन समितीने लक्षात घेऊन गेल्या २४ नोव्हेंबर २0१७ रोजी गटविकास अधिकारी खामगाव यांना निवेदन देण्यात आले. या शाळेवर एक शिक्षक देण्यात यावा, अशी  मागणी केली;  मात्र प्रशासनाकडून मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे  पालकांनी एकत्र येऊन आता आपल्या मुलांना शाळेतच पाठवायचे नाही, असा निर्णय घेऊन ३१ जानेवारीपासून येथील पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे.  दरम्यान, एका आठवड्यात शिक्षक मिळाला नाही, तर उमरा येथील विद्यार्थ्यांची शाळा ही खामगाव पंचायत समितीच्या प्रांगणात भरवणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 ३१ जानेवारीपासून शाळेत एकही विद्यार्थी आला नाही. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पालकांना विचारणा केली असता, शिक्षक मिळेपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे उत्तर पालकांकडून दिल्या जात आहे.- धीरज ठाकरे,प्रभारी मुख्याध्यापक म.प्रा. शाळा उमरा (लासुरा)

येथील एका शिक्षकांची गेल्या सव्वा वर्षापासून बदली झाली; मात्र त्यांच्या जागी आजपावेतो येथे दुसरा शिक्षक मिळाला नाही. विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होत असल्याने दुसरा शिक्षक मिळेपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नाही. - प्रकाश श्रीरंग दांडगे,पालक उमरा (लासुरा)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा