शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

गरीबांची ‘उज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:58 AM

Ujjwala scheme गॅसचे भाव गगणाला भिडल्याने उज्वला याेजनेचे ग्रामीण भागातील भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतुने केंद्र सरकारने उज्वला याेजनेंतर्गंत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यात गॅसचे भाव गगणाला भिडल्याने तसेच सबसीडीही जवळपास बंदच झाल्याने उज्वला याेजनेचे ग्रामीण भागातील भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.    स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच 'बजेट"कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वनवन भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या  हेतुने केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान उज्वला याेजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले.  मात्र,  दरात हाेत असलेलेल वाढ लाभार्थीसाठी डोकेदुरवी ठरत आहे. 

सिलिंडरचे दर गरीबांच्या आवाक्या बाहेर उज्वला याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी जानेवारी  २०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते. जानेवारी २०२९ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहचले, त्यानंतर या महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१मध्ये सिलिंडरचे दर ७८९. ५० रुपयांवर पोहचले आहे.

गृहीनी म्हणतात चुलीवरच स्वयंपाक बरा...  उज्वला याेजनेंतर्गंत गॅस मिळाल्याने  रवूप आनंद आला होता. मात्र, सिलिंडर खूप महाग झाल्याने आता तोंडचे पाणी पळाले आहे. महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने  चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आपच्यासारख्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवरील सबसीडी वाढवण्याची गरज आहे.

- भारती बाहेकर, किन्हाेळा 

गत काही महिन्यांपासून महागाइई माेठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वच वस्तुंचे भाव वाढत असताना गॅस सिलिंडरचे भावही वाढले आहे. दरररोज वाढत जाणारी पहागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागवितांना नाकीनऊ येत आहे. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा  लागत आहे.  -सारीका महाकाळ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना