शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजारावर शाळा, महाविद्यालय बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 13:50 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दिवाळीच्या सुट्टीनंतर ७ नोव्हेंबरला जिल्हा परिषद शाळांची पहिली घंटा वाजली. त्यानंतर शनिवारी अयोध्या निकाल जाहीर झाला. या निकालाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने सोमवारी जिल्ह्यातील दोन हजारावर शाळा, महाविद्यालयांना एक दिवस सुट्टी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे.अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल जाहीर होताच शनिवारपासून बुलडाणा जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शनिवारपासून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील काही संवेदनशील भागात कलम १४४ लागू केले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरण शांत असले तरी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी सोमवारी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. प्रशासनाच्या सुचनेनुसार सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले.

सलग सुट्यांचा शिक्षकांना फायदासोमवारी जिल्हा प्रशासनाच्या सुचनेने दिलेल्या सुट्टीमुळे शिक्षकांना सलग सुट्टयांचा मोठा फायदा झाला. यामध्ये अयोध्या निकालाच्या अनुषंगाने १० नोव्हेंबरला सुट्टी आणि ११ नोव्हेंबरला रविवारची सार्वजनिक सुट्टी आली. त्यानंतर १२ नोव्हेंबरला पुन्हा ‘कलेक्टर डिक्लेर’ सुट्टी देण्यात आली. १३ नोव्हेंबर रोजी गुरूनानक जयंतीची सुट्टी आली. त्यामुळे सलग चार दिवस सुट्ट्या शिक्षकांना मिळाल्या आहेत.सर्व शाळांकडून आदेशाचे पालनअयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश आले होते. त्यानुसार सर्व शाळांकडून त्या आदेशाचे पालन करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसला तरी, प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता.- अमोल तेजनकर, जिल्हाध्यक्ष, राज्य खा. प्रा. शिक्षक संघटना.सुरक्षेच्या दृष्टीने शाळा बंदजिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना आल्या त्यानुसार सर्व पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी व इतर शिक्षण विभागातील यंत्रणांना कळविण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली.- इजाजुल खान, शिक्षणाधिकारी.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा