शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 18:49 IST

ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना देउळगाव राजा येथील बायपास रस्त्यावर क्रीडा संकुल जवळ शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक संजय नगर येथील दोघे मित्र शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच-२०-बीडब्ल्यू-२१९१ द्वारे चिखली मार्गावरून संजय नगर येथे आपल्या घराकडे येत होते. विरुद्ध दिशेने येणारा ट्रक एमपी-१४-एसी-०२८८ व दुचाकीची अमोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये शेख सिराज शेख जमाल उर्फ जुम्मा (वय २७) जागीच ठार झाला तर शाहरुख खान (वय २४, हा गंभीर जखमी झाला. त्यास प्रथमोपचारानंतर जालना येथे हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अपघात घडला त्या ठिकाणाहून दोघांची घरे हाकेच्या अंतरावर असल्याने नातेवाईकांसह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृतक शेख सिराज यास दीड वर्षाची मुलगी होती तर शाहरुख हा अविवाहित होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. मृत दोन्ही युवकांच्या पार्थिवावर स्थानिक कब्रस्तानमध्ये अंत्यविधी करण्यात आला. अपघातास कारणीभूत ट्रक पोलिसांनी जप्त केला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजाAccidentअपघात