शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

खामगाव : पोलिसांच्या कारवाईमुळे टळली दोघांची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:39 IST

खामगाव : मद्य प्राशन करून  भरधाव वाहन चालवणार्‍या दोघा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, कारवाई करण्यात आलेले दोघेही जण उच्च शिक्षित तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वाहन चालवित होते ! 

ठळक मुद्देखामगाव पोलिसांची अशीही सामाजिक बांधीलकी विद्यार्थी, एका डॉक्टरचा आहे समावेश

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मद्य प्राशन करून  भरधाव वाहन चालवणार्‍या दोघा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, कारवाई करण्यात आलेले दोघेही जण उच्च शिक्षित तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वाहन चालवित होते ! शहर पोलिसांकडून मद्य प्राशन करून वाहन चालविणार्‍याविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. मलकापूर रस्त्यावर एक तरुण मद्य प्राशन केलेल्या स्थितीत दुचाकीवरून भरधाव जात होता. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली. सदर युवक नागपूर येथील असून, तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. वडील रागावल्याने तो दोन दिवसांपासून दुचाकी घेऊन घरातून निघाला होता. शेगाव येथे थांबून मद्य प्राशन केल्यानंतर तो मलकापूरकडे भरधाव जात होता. पोलिसांनी कारवाई केलेल्या दुसर्‍या घटनेतील व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे. सदर डॉक्टर शेगाव तालुक्यात एका आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आहेत. अलिकडेच त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.   शस्त्रक्रियेमुळे होणार्‍या वेदनेमुळे ते त्रस्त होते. पत्नी गावाला गेल्यानंतर सदर डॉक्टरने मद्यपान केले. अपघात घडविण्याच्या दृष्टीने शेगाव रस्त्यावर भरधाव वाहन चालवित असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. डॉक्टरला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता ही माहिती उजेडात आली.  आपण केलेल्या कारवाईमुळे दोन जणांचे प्राण वाचल्याचे वेगळेच समाधान पोलीस पथकाला मिळाले. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेबाबत सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. 

पालकांना अश्र्रू झाले अनावर!नागपूर येथून निघालेल्या युवकाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधला. नागपूर येथून त्याचे पालक तत्काळ खामगावकडे निघाले, तोपर्यंत पोलिसांनी सदर तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये थांबवले. त्याचे समुपदेशनही केले. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला आपला मुलगा सुखरुप असल्याचे पाहून या पालकांचे अश्रू  अनावर झाले होते.  

खामगाव शहर पोलिसांच्यावतीने मागील महिन्यांपासून मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍यांवर  मोहीम राबविण्यात येत आहे.  सामाजिक जाणिवेतून काही युवकांची चौकशी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. आत्महत्येच्या विचाराची कबुली दिल्यानंतर युवकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.- यू.के.जाधवपोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिसCrimeगुन्हा