शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात लालपरीने मिळविले साडेअठरा कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:03 IST

State Transport News दोन महिन्यात एकूण १८ कोटी ५३ लाख आठ हजार ४२१ रुपयांचे उत्पन्न मिळविले.

ठळक मुद्देलाॅकडाऊननंतरच्या काळातील हे  उच्चांकी उत्पन्न ठरले. एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाने गत नोव्हेंबर महिन्यात आठ कोटी ५३ लाख ५१ हजार १८३ तर डिसेंबरमध्ये नऊ कोटी ५१ लाख ८७ हजार २३८ असे दोन महिन्यात एकूण १८ कोटी ५३ लाख आठ हजार ४२१ रुपयांचे उत्पन्न मिळविले. लाॅकडाऊननंतरच्या काळातील हे  उच्चांकी उत्पन्न ठरले. या उत्पन्नाने महामंडळाला एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊन काळात एसटी वाहतूक ठप्प असल्याने महामहामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. लाॅकडाऊननंतर २० ऑगस्ट २०२० रोजी वाहतूक सुरू करण्यात आली. सुरुवातीला काेरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने सर्व उपाययोजनांचा अवलंब करण्यात आला. सुरुवातीच्या काळात झिगझॅग पद्धतीने एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ ५० टक्के क्षमतेने वाहतूक करण्यात येत होती. तरी देखील भीतीपोटी नागरिकांनी प्रवासासाठी एसटीकडे पाठ फिरविली होती. मात्र त्यानंतरच्या काळात हळूहळू एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. यामुळे अतिशय तोट्यात चाललेल्या एसटी मंडळाने काही प्रमाणात उत्पन्न सुरू झाले. हे उत्पन्न वाढविण्यासाठी दिवाळी सणाचा महत्त्वपूर्ण हातभार लागला. दिवाळीपासून खऱ्या अर्थाने एसटी वाहतूक सुरू झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढणार आहेे.

कोरोना काळातील लाॅकडाऊनमुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता एसटी वाहतूक सुरळीत झाल्याने येणाऱ्या काळात उत्पन्नात निश्चितपणे वाढ होणार आहे.-ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी