शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीवर कार अपघातामध्ये दोन ठार, चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 19:27 IST

नागपूरवरून पुण्याला कारद्वारे या व्यक्ती जात होत्या.

दुसरबीड : समृद्धी महामार्गावर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये दोनजण ठार, तर चारजण जखमी झाल्याची घटना ६ मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. नागपूरवरून पुण्याला कारद्वारे या व्यक्ती जात होत्या.

कार (एमएच १२-आरएक्स-००७०) ही नागपूरवरून पुण्याकडे जात होती. दरम्यान, समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरमध्ये चॅनेल क्रमांक ३२८.८ दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ही कार रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये दोनजण ठार झाले, तर चारजण जखमी झाले. मृतामध्ये मुकेश कुमार, रवी कुमार यांचा समावेश आहे. जखमींमध्ये तब्रेज निहालजी, संजय पाचार, राजेश कुमार, संजय कुमार यांचा समावेश आहे. या अपघातामध्ये कारचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

अपघातामधील जखमींना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून हलवून नंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा