शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर कार-दुचाकी अपघातात दोन ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:15 IST

Accident News मृत्यू पावलेल्या दोघांपैकी एक जण वर्धा जिल्ह्यातील तर दुसरा हा मुंबईमधील मलाड भागातील आहे.

ठळक मुद्देकारमधील एकाचा व दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.दोन गंभीर जखमींना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबिबी: सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर लोणार तालुक्यात पिंप्री खंदारे गावानजीक कार व दुचाकीचा अपघात होऊन दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांपैकी एक जण वर्धा जिल्ह्यातील तर दुसरा हा मुंबईमधील मलाड भागातील आहे. अपघातामधील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.लोणार तालुक्यातील बिबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंप्री खंदारे गावानजीक मारुती मंदिराच्या जवळ हा अपघात झाला. यामध्ये  मनप्रीत तेजिंदरसिह नारंग (रा. मलाड, मुंबई) व  अक्षय राऊत (रा. घराळा सेलू, ता. सेलू, जि. वर्धा) या दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, निकिता राऊत आणि त्यांचा मुलगा हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले  आहे. या अपघातामध्ये कारमधील एकाचा व दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी दुपारी एका कारमध्ये (एमएच-३२- वाय-५२३८)  अक्षय राऊत व त्यांचे कुटुंबीय सिंदखेडराजाकडून मेहकरकडे जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने  दुचाकीवर मनप्रीत तेजिंदरसिंह नारंग (एमएच-४७-एम-१३००) हे सिंदखेडराजाकडे जात होते. पिंप्री खंदारे गावानजीक दुचाकी  व कारची दुपारी दीड वाजेच्या सुमारास जबर धडक झाली. त्यात मनप्रीत नारंग यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अक्षय राऊत, निकिता राऊत त्यांचा मुलगा या गंभीर जखमींना बिबी ग्रामीण रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी अक्षय राऊत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गंभीर जखमी निकिता राऊत व त्यांचा मुलगा यांना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.मृत्यू पावलेल्या दोघांचेही पार्थिव हे  बिबी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. बिबी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातSindkhed Rajaसिंदखेड राजा