शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला हटकल्याने दोन गटात हाणामारी; अवैध रेती उत्खननामुळे पेटला वाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:31 IST

नांदुरा : शहरातील पंचवटी परिसराजवळील ज्ञानगंगा नदीपात्रात प्रातर्विधीसाठी गेलेल्या १६ वर्षीय तरुणीला त्या नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणार्‍या तरुणांच्या टोळक्याने हटकल्याने ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. 

ठळक मुद्देनांदुरा पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शहरातील पंचवटी परिसराजवळील ज्ञानगंगा नदीपात्रात प्रातर्विधीसाठी गेलेल्या १६ वर्षीय तरुणीला त्या नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणार्‍या तरुणांच्या टोळक्याने हटकल्याने ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. नांदुरा पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली; मात्र रात्रीपर्यंत नांदुरा शहरात तणावपूर्ण शांतता असून, संध्याकाळपासून जिल्हा पोलीस अधीक्षक तळ ठोकून होते व अतिरिक्त पोलीस फाटा शहरात तैनात करण्यात आला आहे.पंचवटी नांदुरा खुर्द परिसराजवळील ज्ञानगंगा नदीपात्रात अवैध रेतीचा उपसा होत असल्याबाबतच्या तक्रारी यापूर्वीच या भागातील नागरिकांनी तहसील कार्यालयात केल्या आहेत; मात्र ३ जानेवारी रोजी दुपारी याच भागातील १६ वर्षीय तरुणी प्रातर्विधीसाठी गेली असता त्या भागात रेतीचे अवैध उत्खनन करणार्‍या टोळक्याने त्या तरुणीला हटकले. याबाबत त्या मुलीने घरी जाऊन आपबिती सांगितली असता याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणासोबत रेती माफिया गुंडांचा वाद होऊन या वादाचे रूपांतर दोन गटातील संघर्ष व हाणामारीत झाले. त्यामुळे नांदुरा खुर्द परिसरात तणाव निर्माण झाला. तणाव वाढल्याने झालेल्या वादात काही घरांचे, दुचाकी व दुकानांचे नुकसान झाले. काही रेती माफिया गुंडांनी घरात घुसून महिलांना मारहाण केल्याने या भागातील नागरिक महिलांसोबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येत असताना नांदुरा खुर्द येथील पुलावर दगडफेक झाली. नांदुर्‍याचे ठाणेदार पाटील व पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.  नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. उशिरा रात्रीपर्यंत नांदुरा शहरात तणावपूर्ण शांतता होती. (प्रतिनिधी)

संरक्षण देण्याची महिलांची मागणीरेती माफिया गुंडांनी महिलांना घरात घुसून मारल्याने घाबरलेल्या महिला रात्रीपर्यंत पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून होत्या. साहेब आम्हाला ते मारतील हो, आम्हाला संरक्षण द्या, अशी आर्त हाक देत होत्या. याबाबत पोलीस प्रशासन त्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्याचे व सुरक्षा करण्याचे आश्‍वासन देत होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा