शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात महावितरणच्या  वसुली पथकातील दोन अभियंत्यास वीज ग्राहकाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 14:22 IST

खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण कंपनीच्या पथकातील दोन अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित

खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण कंपनीच्या पथकातील दोन अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यावेळी मारहाणीच्या निषेधार्थ  सुमारे १०० अधिकारी-कर्मचाºयांच्या जमावाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर धडक दिली. याप्रकरणी मारहाण करणाºया ग्राहकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून महावितरणकडून त्याचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.सध्या महावितरण कंपनीकडून खामगाव शहर व ग्रामीण परिसरात थकीत विद्युत बिल वसुलीची विशेष धडक मोहीम सुरु आहे. यामध्ये विविध क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांचे पथक बनवून वसुली करण्यात येत आहे. दरम्यान येथील दाळफ ैल भागातील रहिवाशी राजू सहारकर या ग्राहकाकडे मार्च २०१६ पासूनचे घरगुती वापराचे १७ हजार रुपयांचे वीज बिल थकलेले असल्याने गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हे पथक सहारकर यांच्याकडे गेले. यावेळी सहारकर याने चिडून जावून पथकातील शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश माहुरकर व फरशी वितरण केंद्राचे प्रभारी सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम शित्रे यांना दमदाटी करित मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच महावितरणचे सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी एकत्र येवून त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला धडक दिली. यावेळी ठाणेदार संतोष ताले यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तर पुरुषोत्तम शित्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजू सहारकर याच्याविरुध्द भादंवि कलम ३५३, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  दरम्यान महावितरणच्या पथकाने रात्री ७.३० वाजताच्या सुमारास दाळफ ैलात जावून सहारकर याच्या घरचा विद्युत पुरवठा कायमस्वरुपी खंडित केला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी