शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

बुलडाणा जिल्ह्यातील उडीदावर एकाच वेळी दोन रोगांचा हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 6:34 PM

बुलडाणा: मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे व सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उडीद पिकावर एकाच वेळी दोन रोगांचा हल्ला झाल्याचे दिसून येत आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे व सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उडीद पिकावर एकाच वेळी दोन रोगांचा हल्ला झाल्याचे दिसून येत आहे. उडीदावर ‘पॉड बोरर’ने आक्रमण केले असून करपा रोगांचा घाला वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावरील उडीद पीक संकटात सापडले आहे. जिल्ह्यात सरासरी २३ हजार ९६९ हेक्टर क्षेत्र उडीद पिकाचे आहे. त्यापैकी यावर्षी ८६ टक्के म्हणजे २० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावर उडीद पेरणी झालेली आहे. उडीद हे ७० ते ७५ दिवसात येणारे पीक असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ होऊ शकतो. सध्या उडीद पीक शेंगा पक्वतेच्या अवसस्थेत आहे. दरम्यान, पेरणीनंतर मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने हे पीक धोक्यात सापडले होते. मात्र गेल्या आठवड्यात संततधार पाऊस झाला त्यामुळे मूग, उडीदासह सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना संजीवनी मिळाली. परंतू पाणी साचुन राहणाºया क्षारपड किंवा हलक्या जमीनीतील पिकांना या संततधार पावसाने फटका बसल्याचे दिसून येत आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना  उडीद पिकाला जास्त पाणी झाल्याने या पिकांवर आता विविध किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचे  प्रकार समोर येत आहेत. मागील आठवड्यातील पावसाने उडीद पिकावर तपकीरी व काळे डाग पडले आहेत. त्यात  सध्या निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे किडीचाही प्रादुर्भाव जाणवत आहे. पॉड बोररचे आक्रमण उडीदावर झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी वेगवेगळ्या औषधांची फवारणी करत आहेत. परंतू सध्या जिल्हाभर किडीसाठी पोषक असे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने महागड्या औषधांचाही किडीवर प्रभाव पडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

हमीभावासाठी येतात अडचणीगतवर्षी उडीद काढणीच्या वेळेस पाऊस आल्याने उडीदावर डाग पडले होते. त्यामुळे शेतकºयांचा उडीद घेण्यास व्यापारी पाठ फिरवत होते. तर हमीभाव मिळणे दुरच. परंतू यावर्षी सध्या उडीद पिकाला तपकीरी डागाचा फटका बसत आहे. या डागांमुळे उडीद पीक धोक्यात सापडले आहे. ‘नॉनएफएक्यू’ दर्जाच्या नावाखाली डाग लागलेल्या उडीदाला हमीभाव मिळण्यासही अडचणी जाण्याची भिती आहे. 

अशी आहे उडीदाची स्थितीसध्या उडीद पीक धोक्यात सापडले असून खोडावर व पनावर तपकिरी ठिपके दिसून येत आहेत. अनेकठिकाणचे पाने पूर्णपणे करपले आहेत. रोगग्रस्त झाड पूर्णपणे वाळण्याची भिती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. सध्या पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्याने शेंगाला सुद्धा किडीने पोखरल्याचे दिसून येत आहे. 

रोगाचे लक्षणं दिसताच पाना ८० टक्के सल्फर टाकावे. दोन ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी. परंतू प्रादुर्भाव जास्त असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार उपायोजना कराव्या. - नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती