जिल्ह्यात दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:35+5:302021-05-17T04:33:35+5:30

जिल्ह्यात आगामी दोन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघ गर्जनेसह हा पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत ...

Two days of torrential rains in the district | जिल्ह्यात दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

जिल्ह्यात दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

Next

जिल्ह्यात आगामी दोन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघ गर्जनेसह हा पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत जिल्ह्यात ताशी ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात मशागतीची कामे करताना काळजी घ्यावी तसेच शेतीमाल उघड्यावर असेल तर तो सुरक्षित स्थळी हलवावा किंवा त्यावर प्लास्टीकचे आवरण टाकून तो झाकून ठेवावा, असे जिल्हा कृषी हवामान केंद्राचे हवामान तज्ज्ञ मनेश येदुलवार यांनी स्पष्ट केले.

--जऊळका परिसरात वादळी पाऊस--

जऊळका परिसरातही रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी परिसरातील जुनी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरावरील टिनपत्रे उडून गेली. त्यातच परिसरात शेतकऱ्यांनी नांगरणी सुरू केलेली आहे. त्यामुळे या पावसामुळे शेती मशागतीला परिसरात वेग येण्याची शक्यता आहे.

--संग्रामपूरमध्येही वादळी पाऊस--

संग्रामपूर: संग्रमापूर तालुक्यातही वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची मका, भूईमूंग, केळी ही पिके धोक्यात आली आहेत. त्यातच तालुक्यात २ हजार २५० हेक्टरवर असलेल्या संत्र्याच्या फळबागाचेही यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

आवश्यक ताण संत्र्याच्या झाडांना न मिळाल्यामुळे आगामी मृगबहारही धोक्यात आल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

Web Title: Two days of torrential rains in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.