शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 कोरोनाग्रस्त दोन रूग्ण; चिखली तालुक्याच्या सर्व सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:54 IST

चिखली शहरात कोरोनाग्रस्त दोन रूग्ण आढळून आल्याने चांगलाच हादरा बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : कोरोनाबाबतीत आजवर सुरक्षित असलेल्या चिखली शहरात कोरोनाग्रस्त दोन रूग्ण आढळून आल्याने चांगलाच हादरा बसला आहे. या पृष्ठभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने खबरदाराची उपाय म्हणून तालुक्याच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी दिले.कोरोनाची लागण झालेले चिखली येथील दोन्ही रूग्ण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती मिळतेय. कोरोना बाधीत रुग्णांकडून हा संसर्ग अन्यत्र वाढू नये, म्हणून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यानुषंगाने ‘कन्टेनमेंट प्लॅन’ राबविण्यास प्रारंभ केला. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या घरास केंद्रबिंदू माणून त्याच्या तीन किमी परिसरापर्यंत नागरिकांच्या हालचाली, फिरणे व संपर्कावर निर्बंध घालण्यात आले. चिखली येथील आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहावी, याकरीता ५ एप्रिल रोजी संपूर्ण चिखली शहराच्या सिमाही सील करण्यात आल्या आहेत. तालुक्यातून बाहेर जाण्यास व दुसऱ्याला तालुक्यात येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

बुलडाणा रोड टी पॉर्इंट जांबवाडी, पळसखेड जयंती रोड, सवणा रोड, शेलूद गावाजवळ, खंडाळा रोडवरील वायझडी धरणावरील पूल, मेहकर फाटा टी पॉर्इंट, जाफ्राबाद रोडवरील रानवारा पर्यंत, साकेगाव रोडवर वरील एका हॉटेलपर्र्यंतचा भागाचा समावेश आहे.४चिखली तालुक्याच्या सिमांसह शहरातील पालिका चौक, रोकडा हनुमान मंदीर, टिळक पुतळा, बैलजौडी चौक, रेणुकामाता मंदीर परिसर, फडके चौक, बाबुलॉज चौक परिसर, खैरूल्लाशाह बाबा दर्गाह, अंगूरचा मळा, माळीपुरा या अंतर्गत रस्त्यांसह राऊतवाडी चौक, आदर्श शाळेसमोर, रोहीदास नगर, डिपी रोड, भंगार गल्ली, जयस्तंभ चौक, कोहीनूर बुट हाऊस, डॉ.सराफ गल्ली व भिमनगर कमान, मौनीबाबा मठ, गोरक्षणवाडी, संभाजीनगर कमान, काझी मशीद, सैलानी नगर चौक, आधार हॉस्पीटल परिसर या भागात सिमाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केवळ यांना राहणार मुभा४शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या अत्यावश्यक सेवेस्तव कार्यपालन करण्याची मुभा देण्यात आली आहे. यानुषंगाने पालिका मुख्याधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना अथवा पासेस पुरवाव्यात व त्यांची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी, तथापी परवाना अथवा पास धारकांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेतच वस्तूंचा पुरवठा करावा आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे, असे या आदेशात स्पष्ट आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली