शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:07 IST

खामगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी संगनमत करून २८ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानावर गुरुवारी रात्री घडली होती. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली आहे.विक्की राजेश हिवराळे रा. शेगाव नाका हा गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास त्याचे मित्र सोनू घाटर्डे, राहुल धेळुंदे, संदिप उर्फ मोगली सारसर तिघे रा. शंकर नगर यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते; परंतु त्यांचा मित्र त्याठिकाणी आला नाही. यावेळी उपरोक्त चौघांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यामध्ये सोनू घाटर्डे, राहुल धेळुंदे, संदिप उर्फ मोगली सारसर यांनी संगनमत करून विक्की हिवराळे यास धारदार चाकूने पोटावर आणि पाठीवर वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर उपरोक्त तिघे घटनास्थळावरून फरार झाले. रात्री फिरायला आलेल्या काही नागरिकांना विक्की हिवराळे हा रक्ताच्या धारोळ्यात पडलेला दिसून आला. यावेळी त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि डिवायएसपी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व घटनास्थळावरून एक मोठा चाकू जप्त केला. याप्रकरणी मृतक विक्की हिवराळेची आत्या श्रीमती कौशल्या निरंजन शर्मा (वय ५०) रा. शेगाव नाका यांनी उपरोक्त तिघांनी भाचा विक्की याचा जुन्या भांडणाच्या कारणावरून खून केल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तातडीने संदीप उर्फ मोगली सारसर यास अटक केली तर बुलडाणा एलसीबी पथकाने मेहकर येथून राहुल धेळूंदे यास ताब्यात घेतले आहे, तर सोनू घाटर्डे याचा शोध सुरू आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी