शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या भाषणाला टिव्हीचा अडथळा

By admin | Updated: August 31, 2014 00:43 IST

शिक्षक दिनाचा संवादासाठी बुलडाणा जिल्ह्यातील ७0 टक्के शाळांमध्ये दूरचित्रवाणीची व्यवस्थाच नाही.

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनाचे औचित्य साधत देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. दूरचित्रवाणी, रेडीओ किंवा इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंतप्रधान संदेश देणार असले तरी हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंंत पोहचविण्यामध्ये साधनांचा अभाव ही प्रमुख अडचण ठरणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ७0 टक्के शाळांमध्ये दूरचित्रवाणीची व्यवस्था नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे गावातून टी.व्ही. ची उसनवारी शिक्षण विभागाला करावी लागणार आहे.जिल्हा परिषद, नगरपालीका व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. राज्याच्या शिक्षण सचिवांनी सर्व शिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात तातडीने सूचना दिली असून आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये काय सुविधा आहेत याची माहिती मागितली आहे. या संदर्भात आज शिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता शाळांमधील साधन व्यवस्थेचा कुठलाही डाटा या कार्यालयाकडे उपलब्ध नव्हता. मात्र वरिष्ठांकडून आलेल्या आदेशावरून आता जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कामाला लागल्याचे दिसून आले. *इंटरनेट कनेक्टीव्हीटीसंगणक असलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांपैकी केवळ २३ शाळांमध्येचे इंटरनेट कनेक्टीव्हीटी असल्याची माहिती आहे. सर्व शिक्षा अभियानातून संगणक मिळालेल्या १९५ शाळांपैकी केवळ ७४ शाळांमध्येच इंटरनेट कनेक्टीव्हीटी आहे मात्र ब्रॉड बॅन्डची सेवा विस्कळीत असल्याने हे संगणक सुद्धा शोभेचे ठरले आहेत.*१00 शाळेत टीव्हीजिल्हा परिषदेच्या १00 शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच बसविण्यात आहे तर खाजगी शाळांमध्ये जवळपास सर्वच शाळांमध्ये ही व्यवस्था संस्थांनी केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील किमान ६00 शाळांमधील विद्यार्थ्यांंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ५ सप्टेबर रोजी प्रसारीत होणारे भाषण टीव्हीवर पाहता येणार आहे. *दूर्गम भागात रेडीओ संग्रामपूर, जळगाव जामोद सारख्या दूर्गम भागातील शाळांमध्ये रेडीओ हाच एकमेव पर्याय प्रशासना समोर आहे. भिंगारा, चाळीसटपरी, गोमाळ अशा अतिदुर्गम भागात तर आजतागायत वीज पुरवठाही पोहचलेला नाही त्यामुळे येथील शाळांमध्ये रेडीओ वरूनच पंतप्रधानांचे भाषण ऐकवावे लागणार आहे.