शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-शेगाव मार्गावर मिनी ट्रकच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:10 IST

खामगाव :  भरधाव मिनी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या दरम्यान शेगाव- खामगाव रोडवर घडली.

ठळक मुद्देचाकीस्वारास ३० फूटापर्यंत नेले फरपटत

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  भरधाव मिनी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या दरम्यान शेगाव- खामगाव रोडवर घडली.शेगाव तालुक्यातील चेतन सुरेश चव्हाण (२५ ) हा युवक एम.एच. २८-एए- ६९७ या मोटारसायकलने सगोडाकडे जात होता. दरम्यान, त्याचवेळी पाठीमागून  येत असलेल्या  एम.एच. ३३-४१५९ च्या मिनी ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवित दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. धडकेत दुचाकीस्वार खाली पडल्यानंतर दुचाकीस्वारास ३० फूट फरपटत नेले. अपघातानंतर मिनी ट्रक चालक घटनास्थळावरून फरार आहे. दरम्यान, अपघातातील दोन्ही पोलिसांनी दोन्ही वाहने पोलीस स्टेशनला जमा केलीत. मृतक कारेगाव हिंगणा येथे पोस्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.

धुळीमुळे अपघातात वाढ!शेगाव- खामगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. डांबरी रस्त्याच्या दुतर्फा कच्चा रस्ता तयार करण्यात आला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेली काही वाहने मुरूम टाकलेल्या कच्च्या रस्त्यावरून वाहने सुसाट धावतात. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य परसते. मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने समोरील वाहन चालकाला काहीच दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या रस्त्यावरून जाताना वाहन चालक स्पीड लिमिट पाळत नसल्याच्याही अनेकांच्या तक्रारी आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघातDeathमृत्यू