शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

राजूर घाटात ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 18:43 IST

Rajur Ghat Accident : ट्रक चालकाने मोठ्या शिताफीने नियंत्रीत करत चालकाने स्वत:चे प्राण वाचविण्यासोबतच ट्रकचे मोठे नुकसान टाळले.

बुलडाणा: राजूर घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेला ट्रक चालकाने मोठ्या शिताफीने नियंत्रीत करत चालकाने स्वत:चे प्राण वाचविण्यासोबतच ट्रकचे मोठे नुकसान टाळले. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेदरम्यान सुदैवाने घाटामध्ये फारशी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला.

जालना येथून आग्रा येथे बाजरीचे बियाणे घेऊन महेंद्रसिंग नामक ट्रक चालक जात होता. समुद्र सपाटीपासून २१९० फूट उंचीवर असलेल्या बुलडाणा शहरालगत असलेल्या राजूर घाटात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ट्रकच्या ब्रेकमधील वायसर खराब झाल्याने ट्रकचे ब्रेक लागत नव्हते. त्यामुळे उतारावर हा ट्रक अनियंत्रित झाला. त्यातच राजूर घाटातील हनुमान मंदिरानजीक जवळपास ८० अंशामध्ये असलेले वळण समोरच असल्याने हा ट्रक सुमारे ४०० फुट दरीत कोसळतो की काय? अशी भीती निर्माण झाली होती. मात्र ट्रक चालक महेंद्रसिंग याने कल्पकता लढवत मंदिरानजीकच्या संरक्षक कठड्यावर ट्रक धडकवला. त्यामुळे संरक्षक कठड्याचे मोठे नुकसान झाले असले तरी चालकाचे प्राण वाचण्यासोबतच ट्रकही दरीत कोसळता कोसळता वाचला. काही स्थानिकांनी हा थरारक प्रसंग स्वत: बघितला. सुदैवाने या घटनेच कुठलीही प्राणहानी झाली नाही. ट्रकाची काही चाके ही संरक्षक कठड्यात अडकल्याने मोठा अपघात टळला.या अपघाताचे वृत्त कळताच बुलडाणा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विनायक रामोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले व घाटातील वाहतूक सुरळीत केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRajur ghatराजूर घाटAccidentअपघात