शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-दुचाकी अपघातात मायलेकांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 10:41 IST

ट्रक व मोटारसायकल च्या भीषण अपघातात मायलेक ठार झाले तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

ठळक मुद्देविमलबाई राजू इरटकर व मुलगा  रोशन ईरटकर यांचा जागीच मृत्यू झाला.राजू शामराव ईरटकर राहणार मोताळा हे गंभीर जखमी झाले.

पिंपळगाव राजा: खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरा फाट्यानजीक दुचाकी व ट्रकच्या अपघातामध्ये मायलेकाचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २७ मे रोजी सकाळी घडल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त कुटूंब हे मोताळा येथील रहिवाशी आहे.या अपघातामध्ये विमल राजू इरटकर (२८), रोशन इरटकर (६) हे दोघे जागीच ठार झाले तर राजू श्यामराव इरटकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त कळताच पिंपळगाव राजा पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमी व्यक्तीस त्वरित पिंपळगाव राजा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा घडला याची अद्याप स्पष्ट माहिती नसली तरी पोलिस सध्या त्या दिशेने तपास करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मात्र अपघातामध्ये मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्यामुळे अपघाताच्या भीषणतेची कल्पना यावी. प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत. मृत झालेल्या मायलेकांचे मृतदेह हे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातkhamgaonखामगावMotalaमोताळा