लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : तालुक्यातील वडनेर भोलजी येथील एका गरीब कुटुंबातील मुलीला तिच्या पतीने तलाक, तलाक, तलाक असे तोंडी शब्द उच्चारून कुटुंबीयांसमक्ष तलाक दिल्याची घटना घडली.मुलीचे लग्न वडनेर भोलजी येथे मलकापूर येथील निजाम खा जब्बार खा या मुलासोबत १७ एप्रिल २०१६ रोजी झाले. लग्नानंतर मुलीला फक्त पंधरा दिवस सासरकडील मंडळीकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर हुंडा कमी मिळाला, मौल्यवान वस्तू कमी मिळाल्या, अशा विविध कारणांवरून मुलीचा छळ करण्यात आला. त्याबाबत मुलीने महिला तक्रार तक्रार दाखल केली होती. परंतु मुलीला न्याय मिळालेला नसून, पीडित महिलेच्या पतीने मलकापूर येथील सलीपुरामधील एका मुलीला पळवून नेऊन दुसरे लग्न केल्याचे म्हटले आहे.
ट्रिपल तलाक प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:50 IST