शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ४२६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 11:13 IST

Transfers of 426 police personnel in Buldana district : ३६ एएसआय, ९४ पोलिस हेडकॉन्स्टेबल, १४८ नायक पोलिस कॉन्स्टेबल, १४८ पोलिस कॉन्स्टेबलचा यामध्ये समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पोलिस दलातील ४२६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरियांनी एका आदेशान्वये ६ ऑगस्ट रोजी प्रशासकीय बदल्या केल्या आहेत.यामध्ये ३६ एएसआय, ९४ पोलिस हेडकॉन्स्टेबल, १४८ नायक पोलिस कॉन्स्टेबल, १४८ पोलिस कॉन्स्टेबलचा यामध्ये समावेश आहे. बदल्यामध्ये पारदर्शकता राहावी व कर्मचाऱ्यांना सोयीचे स्थान मिळावे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मार्च महिन्यात पोलिस कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविले होते. यामध्ये संबंधितांकडून ३ पसंतीची स्थाने ही लिहून घेण्यात आली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यासंदर्भाने जिल्हा पोलिस मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याच्या आधारावर पसंतीच्या तीन स्थानापैकी एका स्थानावर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना नेमणूक देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये काहींना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर दिसून येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस