शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा जिल्ह्यातील तीन तहसीलदारांची बदली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:49 IST

Buldhana District Tahsildar News बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर व नांदुरा तहसीलदारांचा सुद्धा समावेश आहे हे विशेष.

n  लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर :  महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर यांनी दिलेल्या निर्णयानुसार तहसीलदार यांचे बदली आदेश रद्द करण्यात आले होते. त्या धर्तीवर अमरावती विभागातील नऊ तहसीलदारांना पूर्वीच्या मूळ पदावर पदस्थापना देत पद स्थापनाच्या पदावर तात्काळ रुजू होण्याचे आदेश ११ नोव्हेंबर रोजी शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन उपसचिव डॉ. माधव वीर यांनी निर्गमित केल्याने त्या सबंध तहसीलदारांना दिलासा मिळाला असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर व नांदुरा तहसीलदारांचा सुद्धा समावेश आहे हे विशेष.    नागपूर व अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी गेल्या १ ऑक्टोंबर रोजी केलेल्या उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांच्या बदल्या महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव ट्रिब्युनल मॅटने २२ ऑक्टोंबर रोजी रद्द करीत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जुन्या जागांवरच तीन आठवड्याच्या आत नियुक्ती आदेश द्यावेत असे न्या.आनंद कारंजकर यांच्या लवादाचे आदेश होते. सबळ कारणाअभावी केलेल्या या बदल्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. बदलीसाठी ग्राह्य धरला जाणार कार्यकाळ पूर्ण झाला नाही किंवा नागरी सेवा मंडळ अथवा महसूल खात्याने ही बदलीची शिफारस केली नाही ही सबब ग्राह्य मानूनन मॅटने अधिकाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता.   त्या धर्तीवर तीन आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर शासन निर्णयाची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा लागून होती. दरम्यान शासन आदेशान्वये १९ नोव्हेंबर रोजी अमरावती विभागातील नऊ तहसीलदारांना बदली नंतरची पदस्थापना मूळ पदावर देण्यात आली. भारत निवडणूक आयोग यांच्या २७ ऑक्टोंबर २०२९ च्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांनी दिलेल्या सहमतीने सदर तहसीलदारांना मूळ पदस्थापनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशावर महाराष्ट्र शासनाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरkhamgaonखामगाव