बुलढाणा जिल्ह्यातील तीन तहसीलदारांची बदली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:49 PM2020-11-21T15:49:09+5:302020-11-21T15:49:18+5:30

Buldhana District Tahsildar News बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर व नांदुरा तहसीलदारांचा सुद्धा समावेश आहे हे विशेष.

Transfer of 3 Tehsildars in Buldhana district canceled | बुलढाणा जिल्ह्यातील तीन तहसीलदारांची बदली रद्द

बुलढाणा जिल्ह्यातील तीन तहसीलदारांची बदली रद्द

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर :  महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर यांनी दिलेल्या निर्णयानुसार तहसीलदार यांचे बदली आदेश रद्द करण्यात आले होते. त्या धर्तीवर अमरावती विभागातील नऊ तहसीलदारांना पूर्वीच्या मूळ पदावर पदस्थापना देत पद स्थापनाच्या पदावर तात्काळ रुजू होण्याचे आदेश ११ नोव्हेंबर रोजी शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन उपसचिव डॉ. माधव वीर यांनी निर्गमित केल्याने त्या सबंध तहसीलदारांना दिलासा मिळाला असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर व नांदुरा तहसीलदारांचा सुद्धा समावेश आहे हे विशेष.    
नागपूर व अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी गेल्या १ ऑक्टोंबर रोजी केलेल्या उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांच्या बदल्या महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव ट्रिब्युनल मॅटने २२ ऑक्टोंबर रोजी रद्द करीत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जुन्या जागांवरच तीन आठवड्याच्या आत नियुक्ती आदेश द्यावेत असे न्या.आनंद कारंजकर यांच्या लवादाचे आदेश होते. सबळ कारणाअभावी केलेल्या या बदल्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. बदलीसाठी ग्राह्य धरला जाणार कार्यकाळ पूर्ण झाला नाही किंवा नागरी सेवा मंडळ अथवा महसूल खात्याने ही बदलीची शिफारस केली नाही ही सबब ग्राह्य मानूनन मॅटने अधिकाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता.   
त्या धर्तीवर तीन आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर शासन निर्णयाची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा लागून होती. दरम्यान शासन आदेशान्वये १९ नोव्हेंबर रोजी अमरावती विभागातील नऊ तहसीलदारांना बदली नंतरची पदस्थापना मूळ पदावर देण्यात आली. भारत निवडणूक आयोग यांच्या २७ ऑक्टोंबर २०२९ च्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांनी दिलेल्या सहमतीने सदर तहसीलदारांना मूळ पदस्थापनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशावर महाराष्ट्र शासनाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांची स्वाक्षरी आहे.

Web Title: Transfer of 3 Tehsildars in Buldhana district canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.