शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील तृतीयपंथीयांचा मलकापूर शहर पोलीस ठाण्यात हल्ला बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 19:03 IST

Malkapur News : या बाबीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्दे पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. मोगराबाई यांनी ही बाब विदर्भातील तृतीयपंथी समाजाच्या कानावर टाकली.

मलकापूर : एका तृतीयपंथीयांच्या घरी चोरीची घटना घडली. तक्रारी दरम्यान संशयितांची नावेही सांगण्यात आली परंतु त्या दिशेने तपास करण्यात येत नसल्याचा आरोप करीत तृतीयपंथीयांनी एकजूट होत मलकापूर शहर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल केला. दरम्यान आपल्या नेहमीच्या  शैलीने निषेध सुद्धा व्यक्त केला. या बाबीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. 

शहरातील पंत नगरमध्ये राहत असलेली मोगराबाई यांच्याकडे ७ मे रोजी रात्री दोन वाजताच्या दरम्यान काही लोकांनी घरात घुसून घरातील लोकांना धाक दाखवत रोख ५० हजार रुपये, बँक पासबुक, आधारकार्ड आणि दागिने असा पाच लाखापर्यंत ऐवज लुटून नेला, अशी तक्रार पोलिसात दिली होती. त्यावेळी काही संशयितांची नावे सुद्धा सांगितले होती. त्या दिशेने पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करीत फिर्यादी मोगराबाई यांनी ही बाब विदर्भातील तृतीयपंथी समाजाच्या कानावर टाकली. १७ मे रोजी नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव खान्देश या जिल्ह्यातील काही किन्नरांनी मलकापूर गाठले. मोगराबाईच्या तक्रारीनुसार तपास करण्याची करण्याची मागणी केली. दरम्यान जमलेल्या तृतीयपंथीयांनी कपडे काढून पोलीस स्टेशनचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केली. एवढेच नव्हे तर काही तृतीयपंथीयांनी आपले कपडे काढण्याचे प्रयत्न करताच पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. एक तास चाललेल्या या गोंधळात पोलिसांना सर्वांची समजूत काढावी लागली. त्यामुळे प्रकरण शांत झाले. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात चर्चा रंगू लागली. पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर सुद्धा या प्रकरणाने चांगलेच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

 

फोटो : शहर पोलिस ठाण्यात धडक देत पोलिसांना जाब विचारतानाा विदर्भातील तृतियपंथी.

टॅग्स :MalkapurमलकापूरPolice Stationपोलीस ठाणेTransgenderट्रान्सजेंडर