शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

वाटर कप स्पर्धेसाठी जामोद तालुक्यातील प्रशिक्षणार्थी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 18:09 IST

धामणगाव बढे : पाणी फाऊंडेशन पुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या तिसºया पर्वात राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारणाºया मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावावरती इतर गावातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पाणी फाऊंडेशनने दिली असून १३ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणाºया प्रशिक्षणासाठी जळगाव जामोद तालुक्यातील ५० प्रशिक्षणार्थींची पहिली बॅच गावात दाखल झाली आहे. 

धामणगाव बढे : पाणी फाऊंडेशन पुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या तिसºया पर्वात राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारणाºया मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावावरती इतर गावातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पाणी फाऊंडेशनने दिली असून १३ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणाºया प्रशिक्षणासाठी जळगाव जामोद तालुक्यातील ५० प्रशिक्षणार्थींची पहिली बॅच गावात दाखल झाली आहे. सिंदखेड प्रजा हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव, कायम दुष्काळाची छाया व पाण्याचे दुर्भिक्ष्य अशा विपरीत परिस्थितीतून गावाला पाणीदार बनविण्याचा संकल्प सरपंच विमल कदम यांनी केला. त्याला गावकºयांची साथ मिळाली. त्यात वाटर कप स्पर्धेचे निमित्त झाले. गावकरी रात्रंदिवस श्रमदानासाठी एकत्र आले. विविध सामाजिक संघटनांचे पाठबळ मिळाले. आ.हर्षवर्धन सपकाळ, अ‍ॅड.गणेशसिंग राजपूत यांनी अनेकवेळा श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. वाटर कप स्पर्धेचा राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार गावाला मिळाला आणि पहिल्याच पावसात गाव पाणीदार बनले आता इतर गावांना पाणीदार बनविण्याची जबाबदारी वाटर फाऊंडेशनने सिंदखेड (प्रजा) गावावर टाकली. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण केंद्र दिले. १३ फेब्रुवारी पासून जळगाव जामोद तालुक्यातील एका वेळी दहा गावातील ५० प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतील. प्रत्येक बॅच चार दिवसाची असेल. सिंदखेड गावाने केलेले पाणलोटची कामे प्रत्यक्ष शिवार फेरीतून दाखविले जातील. पाणलोटाचे मॉडेल तसेच इतर प्रात्यक्षिकाव्दारे जलसंधारणाचे धडे देण्यात येतील. स्पर्धेचे नियम, मुल्यांकन, शिकविले जाईल.  खेळ, कृतिगिताच्या माध्यमातून मनसंधारण केले जाईल. यासाठी प्रशिक्षक टिम सज्ज झाली असून त्यामध्ये तांत्रिक प्रशिक्षक मिलिंद आडे, चंद्रशेखर गोडघाटे, सामाजिक प्रशिक्षक सविता दांडगे, परमेश्वर आगलावे, तांत्रिक सहाय्यक चेतन घागरे यांचा समावेश आहे. तर प्रशिक्षणार्थींच्या व्यवस्थेसाठी गावकºयांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक सतिश राठोड, बिंदीया तेलगोटे, ब्रम्हदेव गिºहे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर परिश्रम घेत आहेत. 

कायम दुष्काळग्रस्त संबोधल्या जाणाºया गावात जलसंधारणाचे धडे घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी येत आहे. झालेला हा बदल गावकºयांच्या एकतेचे, संघर्षाचे व श्रमदानाचे हे प्रतिक आहे. भविष्यात जलसंधारणाचे धडे घेण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून लोक येतील एवढे परिवर्तन आम्ही घडवू.-प्रविण कदमसामाजिक कार्यकर्ता, सिंदखेड

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा