शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

धान्य वाहतूक वाहनांच्या ‘टोल’ पावत्याही गहाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:09 IST

खामगाव : गोंदीयासह इतर जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात धान्य वाहतूक करणाºया अनेक वाहनांच्या टोल टॅक्स पावत्या गहाळ असल्याचे दिसून येते.

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : गोंदीयासह इतर जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात धान्य वाहतूक करणाºया अनेक वाहनांच्या टोल टॅक्स पावत्या गहाळ असल्याचे दिसून येते.  धान्य वाहतूक करणाºया वाहनांच्या टोल पावत्या तात्काळ सादर करण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या निर्देशाला सतत दोन महिन्यांपासून जिल्हा पुरवठा विभागाकडून केराची टोपली दाखविली जात आहे. धान्य वाहतूक कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याने, याप्रकरणी जिल्हाधिकाºयांनी  गंभीर आक्षेप नोंदविल्याचे समजते.

बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्य घोटाळ्याला जिल्हा पुरवठा विभागाकडून खतपाणी घातले जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती वेळोवेळी समोर आली आहे. धान्याची वाहतूक करताना अफरातफरीसोबतच ‘स्वस्त धान्याचा ट्रक कोठे जाणार; याची नोंद नसल्याचा प्रकार म्हणजेच‘स्टेटमेंट-२’च्या घोळाचा प्रकार एप्रिल महिन्यात उजेडात आला. तर जुलै महिन्यात‘ट्रान्सपोर्ट पास’ देयकाचा घोळ उघडकीस आला. ट्रान्सपोर्ट पासचा देयकाचा प्रकार ताजा असतानाच, गोंदीया, भंडारा, नागपूर आणि इतर जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्याकरीता झालेल्या धान्य वाहतूक संदर्भातील वाहनांचे टोल नाक्यावरील टोल टॅक्स भरल्या बाबतच्या पावत्या गहाळ असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

 जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्य वाहतुकीमध्ये टोल नाक्यावरील नोंदीच्या आधारे पडताळणी केली असता, अनेक वाहने वाहने नियोजित ठिकाणी पोहोचले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.  यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांच्यांशी संपर्क होवू शकला नाही.

 

कृष्णूर धान्य घोटाळ्याची आठवण ताजी!

नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यासारखाच हा घोळ असल्याची चर्चा आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर येथील पुरवठा विभागात तब्बल १९३ ट्रकची नोंद टोलनाक्यावर नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली होती. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातही इतर जिल्ह्यातून खरोखरं धान्य वाहतूक झाली अथवा नाही?, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.

जिल्हाधिकाºयांचे पुरवठा विभागाला पत्र!

 बुलडाणा जिल्ह्यात धान्य वाहतूक केलेल्या वाहनांचे टोल नाक्यावरील टोल टॅक्स भरल्या बाबतच्या पावत्या संबंधीत वाहतूक कंत्राटदारांकडून तात्काळ प्राप्त करून विना विलंब सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी २४ आॅक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केले. मात्र, आदेशीत तारखेपासून अद्यापपर्यंतही या पावत्या जमा करण्यात आल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावfraudधोकेबाजी