शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत वाहतूक नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:52 IST

चालक सर्रास मोबाईल कानाला लाऊन बस चालवित असल्याने प्रवाशांना वेठीस धरल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : एसटीत वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. बस चालविताना मोबाईलवर बोलणे बंधनकारक असतानाही, चालक सर्रास मोबाईल कानाला लाऊन बस चालवित असल्याने प्रवाशांना वेठीस धरल्या जात आहे.वाहन चालविताना मोबाईल संभाषण करणे धोकादायक असतानाही, चालक या नियमाची सर्रास पायमल्ली करताना दिसून येत आहेत. विशेष करून एस टी बस चालविताना अतिशय धोक्याचे आहे. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु तरीही वाहनचालक मोबाईलचा वापर टाळत नसल्याचे दिसून येत आहे. एखाद्यावेळी प्रवाशाने चालकाला बस चालविताना मोबाईलवर बोलू नका, असे म्हटल्यास प्रवाशांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही घडतात. एकंदरीत यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो.असाच प्रकार शेगाव ते जळगाव जामोद, शेगाव ते खामगाव, अकोला ते खामगाव या बसेसमध्ये बसचालक मोबाईलवर संभाषण करीत असलेल्याचे दिसून आले. शेगाव ते जळगाव जामोद बस क्रमांक एम.एच.२० बी. ५६९३, शेगाव ते खामगाव बस क्रमांक एम.एच. १४ सी. डी. ७२७३ व अकोला ते खामगाव बस क्रमांक एम.एच. १२ सी. २५२८ या बसचे चालक बस चालविताना मोबाईलवर संभाषण करीत होते. यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. विशेष म्हणजे बस चालकांचे बस चालविताना मोबाईलवर बोलणे, हे चित्र सध्या सर्रास पाहायला मिळत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावstate transportएसटी